National Pension Scheme : (Retirement)  सरकारी कर्मचाऱ्यांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी सरकारने राष्ट्रीय पेन्शन योजना (National Pension Scheme) 2004 मध्ये सुरू केली होती. नंतर त्यात काही बदल करून ते सर्वांसाठी खुले करण्यात आले. खाजगी क्षेत्रातील (Private Sector) आणि सरकारी क्षेत्रातील (Government sector) लोकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.


राष्ट्रीय पेन्शन योजनेतून पैसे काढण्याची गरज सहसा तीन वेळा उद्भवते. म्हणजेच निवृत्तीनंतर, गुंतवणूकदाराचा अकाली मृत्यू झाल्यास आणि मुदतपूर्तीपूर्वी अचानक पैशांची गरज भासल्यास. कोरोना महामारीच्या काळात सरकारने जास्तीत जास्त लोकांना यामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. याआधी, या योजनेअंतर्गत, तुम्ही 10 वर्षांच्या गुंतवणुकीनंतर या योजनेतून पैसे काढू शकता. पण, आता नियम बदलून तुम्ही तीन वर्षांच्या नोकरीनंतरही पैसे काढू शकता.


'या' अटी कराव्या लागतील पूर्ण :



  • जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी अकाऊंट उघडले असेल तरच तुम्ही NPS खात्यातून पैसे काढू शकता. 

  • तुम्ही तुमच्या गुंतवणुकीपैकी फक्त 25 टक्के रक्कम काढू शकता. ही रक्कम फक्त तुमच्या ठेव रकमेवर मोजली जाईल. त्यात व्याजाची रक्कम जोडता येत नाही.

  • आजारपणात, मुलांच्या शिक्षणासाठी तसेच लग्नविधीच्या कामासाठी तुम्ही पैसे काढू शकता.

  • दोन Withdrawal मध्ये पाच वर्षांचे अंतर असणे अपेक्षित आहे. 

  • जर तुम्ही आजारपणामुळे हे पैसे काढत असाल तर पाच वर्षांची अट लागू होत नाही.


नॅशनल पेन्शन स्कीममधून पैसे काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रं



  • पॅन कार्डची फोटो कॉपी

  • रद्द केलेला चेक (Cancelled चेक)

  • राष्ट्रीय पेन्शन स्कीम सारख्या मिळालेल्या रकमेची पावती 

  • तुमचा आयडी जसे की, आधार कार्ड, रेशन कार्ड 


अशा प्रकारे पैसे काढू शकता :


जर तुम्हाला राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत पैसे काढायचे असतील तर तुम्ही यासाठी ऑनलाईन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला NPS वेबसाईटवर जाऊन सर्प्रव क्रिया पूर्ण करावी लागेल. याशिवाय, नॅशनल पेन्शन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज, तुम्ही पैसे काढण्याचा फॉर्म (601-PW) भरू शकता. आवश्यक कागदपत्रांसह पॉइंट ऑफ प्रेझेन्स (Point of Presence) सेवा प्रदात्याकडे सबमिट करू शकता. लक्षात ठेवा तुमच्या पेन्शन खात्यात जमा केलेली रक्कम एक लाखांपेक्षा कमी असेल तर सर्व पैसे एकाच वेळी काढले जाऊ शकतात. 


महत्वाच्या बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha