Share Market Updates :  मंगळवारी सकाळी शेअर बाजारात काहीसा वधारला होता. मात्र, त्यानंतर पुन्हा घसरण सुरू झाली. प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात किंचित तेजी दिसून आली होती. बीएसई निर्देशांक सेन्सेक्स 57,812 अंकावर उघडला. तर, एनएसई निर्देशांक निफ्टी 55.95 अंकांनी वधारत 17, 269 अंकावर सुरू झाला. 


शेअर बाजारात सकाळपासूनच चढ-उतार दिसून आला. सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 100 अंकांनी घसरला होता. सेन्सेक्स 57,508 अंकावर होता. तर, निफ्टी 17,184 अंकांवर ट्रेड करत होता. शेअर बाजार ट्रेडिंग चार्ट 'व्ही' आकारात दिसत होता. मात्र, शेअर बाजारात दिवसभर चढ उतार राहण्याची दाट शक्यता असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.


सोमवारीही घसरण 


सोमवारी, शेअर बाजार बंद होताना सेन्सेक्स 1023.63 अंकांनी तर निफ्टीही 302 अंकानी घसरला. सेन्सेक्समध्ये 1.75 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,621.19 वर पोहोचला होता. तर निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,213.60 वर पोहोचला होता. सोमवारी 1389 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर 2044 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 131 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.  


सोमवारी बाजार बंद होताना सार्वजनिक बँक, मेटल, आणि उर्जा क्षेत्रातल्या शेअर्समध्ये वाढ झाली. तर बँक ऑटो, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी सेक्टरच्या शेअर्समध्ये विक्री झाल्याचं दिसून आलं.  BSE मिडकॅपमध्ये 1 ते 2 टक्यांची तर आणि स्मॉलकॅपमध्येही 0.75 ते 1.25 टक्क्यांची घसरण झाली.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha