मुंबई मागील काही काळात म्युच्युअल फंडमध्ये (Mutual Fund Investment) गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा ओढा वाढत चालला आहे. बाजाराची कमी जोखीम आणि चांगला परतावा यामुळे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याकडे अनेकांचा ओढा वाढला आहे. आता, म्युच्युअल फंडमध्ये डेबिट कार्डच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. जर तुमच्याकडे VISA डेबिट कार्ड असेल तर कोणत्याही अडचणींशिवाय गुंतवणूक करता येणार आहे. यासाठी बँक अकाउंट जोडण्याची आवश्यकता नाही. 


व्हिसा कार्डने ही सुविधा सुरू केली आहे.  ही सुविधा देण्यासाठी Razorpay सोबत भागीदारी केली आहे. मात्र, सध्या सर्व बँक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार नाही. 'इकॉनॉमिक टाईम्स'च्या वृत्तानुसार, या सुविधेचा लाभ फक्त फेडरल बँक आणि आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक घेऊ शकतात.


ग्राहक ठरवू शकतात गुंतवणुकीची मर्यादा


व्हिसा डेबिट कार्ड वापरून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येईल,  असे वृत्तात म्हटले आहे. तुम्ही किती रुपयांची गुंतवणूक करायची आहे, याची रक्कम ठरवू शकता आणि त्यात बदलही करू शकता. डेबिट कार्डशी लिंक केलेले सर्व SIP, इतर रेकरिंग पेमेंटसह, गुंतवणूकदार त्यांच्या बँकेच्या सब्सक्रिप्शन मॅनेजमेंट पोर्टलवर लॉग इन करून पाहू शकतात.


गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढणार असल्याचा अंदाज


व्हिसा इंडियाचे प्रमुख रामकृष्णन गोपालन म्हणाले की, 69 दशलक्षाहून अधिक म्युच्युअल फंड एसआयपी खाती असलेल्या देशात डेबिट कार्ड पेमेंटमुळे एक वेगळी सुविधा मिळणार आहे. म्युच्युअल फंडात या सुविधेचे अनेक फायदे होतील. म्युच्युअल फंडातील या पेमेंट प्रक्रियेमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढेल. याशिवाय म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा आत्मविश्वासही वाढेल. यासह आणखी काही लोक म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे वळतील असा विश्वास गोपालन यांनी व्यक्त केला. 


VISA कार्ड नेटवर्क म्हणजे काय?


आपल्या क्रेडिट कार्ड अथवा डेबिट कार्डवर कार्ड प्रोव्हाइडरचे नाव असते. मास्टर कार्ड, व्हिसा कार्ड, डायनर्स क्लब  आदी सब कार्ड प्रोव्हाइडरचा समावेश आहे. बँकांसोबत भागिदारी करून ग्राहकांना पेमेंट प्रोसेसची सुविधा देते. त्याशिवाय, बँक आणि ग्राहकांना जोडण्याचे काम करते. 


म्युच्युअल फंड गुंतवणूक फायदेशीर 


 जर एखाद्याने शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक केली तर म्युच्युअल फंडद्वारे तुम्हाला दीर्घकाळात सुमारे 12-15 टक्के परतावा मिळू शकतो. प्रत्येकजण भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक करतो. गुंतवणूकदार त्यांच्या सोयी आणि आर्थिक उद्दिष्टांनुसार बँक एफडी, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करतात.   


(Disclaimer : म्युच्युअल फंडमधील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारीत आहे. म्यच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आर्थिक सल्लागार, तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)


इतर महत्त्वाच्या बातम्या :