Mumbai Real Estate: भारताच्या चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते अर्थात बीग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे शेजारी जर कोणाला व्हायचे असेल, ती संधी तुम्हाला मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला मोठी रक्कम खर्च करावी लागेल. अमिताभ बच्चन हे मुंबईतील जलसा (Jalsa) या निवासस्थानी राहतात. त्यांच्या बंगल्याच्या शेजारी असलेल्या एका बंगल्याचा लिलाव होणार आहे. या महिन्यातच हा लिलाव होणार असून तुम्ही अमिताभ बच्चन यांचे शेजारी राहण्याचा विचार करु शकता.  


येत्या 27 मार्चला लिलाव होणार


अमितभ बच्चन यांच्या घराशेजारी एक बंगला आहे. या बंगल्याचा येत्या 27 मार्चला लिलाव होणार आहे. या बंगल्याच्या आत आणि बाहेरही मोठा स्पेस ठेवण्यात आला आहे. लिलाव करण्यात येणारा बंगला 3 हजार स्क्वेअर फुटाचा आहे. दरम्यान, या बंगल्याच्या लिलावाची सुरुवातीची किंमत 25 कोटी रुपये ठेवण्यात आलीय. 25 कोटी रुपयांच्या पुढे जे कोणी बोली लावतील ते या बंगल्याचे मालक होतील. तसेच अमिताभ बच्चन यांचे शेजारी होतील.  


नेमका का केला जातोय बंगल्याचा लिलाव ?


अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की अमिताभ बच्चन यांच्या शेजारी असणाऱ्या बंगल्याचा नेमका लिलाव का केला जाणार आहे. तर या बंगल्यावर बँकेचं मोठं कर्ज आहे. या बंगल्यावर घरमालकाने बँकेकडून मोठं कर्ज घेतलं होतं. बँकेने या कर्जदारांना 12.89 कोटी रुपयांची थकबाकी भरण्यासाठी वारंवार सांगितले होते. मात्र, कर्जदारांनी हे कर्ज भरले नाही. त्यामुळं अकेर बँकेनं या बंगल्याचा लिलाव करणयाचा निर्णय घेतला आहे. या लिलावाची सुरुवातीची किंमत 25 कोटी रुपये ठेवण्यात आलीय. 


बंगला खरेदी करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल?


तुम्हाला अमिताभ बच्चन राहत असलेल्या जलसा या निवासस्थानाजवळ राहायचे असेल तर तुमची आर्थिक स्थिती मजबूत हवी. बच्चन यांच्या शेजारचा बंगला खरेदी करण्याच्या प्रक्रियेत भाग घेण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला अडीच कोटी रुपये भरावे लागतील. ज्यावेळी तुम्ही अडीच कोटी रुपये भराल, त्याचवेळी तुम्ही या लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ शकाल, अन्यथा तुम्हाला यामध्ये भाग घेता येणार नाही. या बंगल्याच्या लिलावाची सुरुवातीची किंमत 25 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. त्यामुळं तुम्हाला जर हा बंगला खरेदी करायचा असेल तर तुमच्या 25 कोटी रुपयापेक्षा अधिक पैसे असणं गरजेचं आहे. पैशांची तजवीज होत असेल तर तुम्ही नक्कीच अमिताभ बच्चन यांचे शेजारी होऊ शकता. या बंगल्याचा लिलाव होण्याची अंतिम तारीख ही 27 मार्च आहे. त्यामुळं तुम्हाला 27 मार्चच्या आत पैशांची जमवाजमव करावी लागणार आहे.  


महत्वाच्या बातम्या:


तब्बल 20 लाख 69 हजार रुपयांना शर्टचा लिलाव, या शर्टमध्ये खास काय?