बारामती, पुणे : अजित पवारांना (Ajit Pawar) शह देण्यासाठी 2024 च्या निवडणुकीत पवारांच्या विरोधातला जनतेच्या मनातला उमेदवार म्हणून उभा राहणार असल्याचं विजय शिवतारेंनी (Vijay Shivtare) सांगितलं आहे. अजित पवारांचा उर्मटपणा गेला नाही. जनता अजित पवारांना निवडून देणार नाही, असा दावा करत विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर आता अजित पवारांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांच लक्ष लागलं होतं. त्यांनंतर आता अजित पवारांनी प्रतिक्रिया समोर आली आहे. निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. प्रत्येकाने आपल्या पक्षश्रेंष्ठींसोबत बोलावं, असं ते म्हणाले आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेतून निवडणूक लढवण्याचा निर्धार केल्यावर अजित पवार म्हणाले की, बारामती आणि माझं वेगळं नातं आहे. बारामतीकर नेहमीच मला प्रतिसाद देतात. दिवसरात्र बारामतीकरांसाठी काम केलं आहे. लोकशाहीत कोणी काय बोलायचं हा त्यांचा अधिकार आहे. त्यासोबतच निवडणूक लढवण्याचा अधिकार सर्वांना आहे. राजकीय वातावरण खराब होईल, असं वक्तव्य कोणीही करु नये. आम्ही महायुतीत काम करतो. महायुतीतील प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते आणि नेत्यांनी आपल्या पक्षाच्या वरिष्ठांसोबत बोलावं, यामुळे राज्याचं राजकीय वातावरण चांगलं राहिल, असं ते म्हणाले.
बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही!
अजित पवार म्हणाले की, आपण वेगळ्या परस्थिती एकत्रित आलो आहोत. काही दिवसातच लोकसभेसाठी आचासंहिता लागेल त्यानंतर आपली काम सुरू होईल. आपण सगळे सगळ्या नियमांचं पालन करु. बारामतीत झालेला बदल आपण पाहिला आहे. बारामतीतील विकासही आपण पाहिला आहे. शेतकऱ्यांनी जर जमिनी दिल्या तर अजून कंपन्या येतील. सध्या सुरु असलेल्या कंपन्यादेखील चांगल्या सुरु आहेत. आतापर्यंत तुम्ही माझं ऐकत आला आहात तुम्ही कधी घड्याळ ची साथ कधी सोडली नाही तुम्ही घड्याळाच्या उमेदवाराला मत द्या. मी आणि उद्याचा होणारा खासदार तुमच्या विश्वासला तडा जाऊ देणार नाही आणि महत्वाचं म्हणजे बारामतीचा विकास करायचा असेल तर माझ्याशिवाय पर्याय नाही, असा दावा अजित पवारांनी केलं आहे.
अजित पवारांच्या सात ठिकाणी सभा
विजय शिवतरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी जाहीर केल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. तर खासदार सुप्रिया सुळे या इंदापूरच्या दौऱ्यावरती असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतील विविध कामांचा शुभारंभ केला. तर बारामती शहरासह तालुक्यातील सात ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार बैठका घेणार आहेत.
इतर महत्वाची बातमी-