Summer Tour : काय झाडी.. काय डोंगर..काय हॉटेल, सगळं ओक्के! सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या वाक्याची चर्चा अवघ्या राज्यभरात झाली. पण त्यांनी असं का म्हटलं तुम्हाला माहित आहे का? कारण तेव्हा ते ज्या ठिकाणी राहत होते, तिथल्या निसर्गाच्या सौंदर्याची कदाचित त्यांना भूरळ पडली असावी, आपल्या भारत देशात अशी अनेक ठिकाणं आहेत, जी निसर्गरम्य (Nature) तर आहेतच.. पण प्रदुषणही नगण्य आहे. आज आम्ही तुम्हाला भारतातील काही शहरांबद्दल सांगणार आहोत जिथे हवा आणि वातावरण अतिशय स्वच्छ आहे. ही शहरे फिरण्यासाठी तसेच मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी योग्य आहेत. शहरांच्या प्रदूषित हवेतून बाहेर पडण्यासाठी तुम्हीही येथे नक्कीच भेट द्यावी.



काय झाडी.. काय डोंगर..! प्रदुषण विरहित ही शहरं तुम्हाला माहित आहेत?


मेट्रो सिटी तसेच इतर शहरांमधील हवा इतकी खराब झाली आहे की लोकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे. पण भारतात अशी काही शहरे आहेत जिथे हवा खूप स्वच्छ आणि शुद्ध आहे. याशिवाय ही ठिकाणे त्यांच्या सौंदर्यासाठीही ओळखली जातात. या शहरांमधील प्रदूषण पातळी कमी करण्यासाठी आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी आम्ही खूप मेहनत घेतली आहे. येथील अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांनी ही ठिकाणे व पर्यावरण स्वच्छ ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एकीकडे मेट्रो शहरांतील लोक धूळ, धुकं, ट्रॅफिक जॅम इत्यादी समस्यांशी झुंजत असताना दुसरीकडे ही शहरे काही दिवस फिरण्यासाठी आणि मोकळा श्वास घेण्यासाठी योग्य आहेत.


 


कोहिमा, नागालँड


नागालँडची राजधानी कोहिमा हे याक्षणी भारतातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे. या शहराचा हवामान रेटिंग AQI 19 आहे,  हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेले कोहिमा शहर नागा संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्हाला रंगीबेरंगी बाजारपेठ, पारंपारिक उत्सव आणि देशी कलाकुसर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतील. पर्यटक येथे येऊन सुंदर पर्वतांचे सौंदर्य पाहू शकतात.


 


कुलगाम, काश्मीर


काश्मीर खोऱ्यात वसलेले कुलगाम शहर हे पाहण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराचा हवामान रेटिंग AQI 22 आहे, कुलगाममध्ये तुम्हाला बर्फाच्छादित पर्वत आणि हिरवेगार गवताळ प्रदेश पाहायला मिळतील. हिमवर्षाव सहसा हिवाळ्यात होतो. कुलगाम शहरी जीवनाच्या गर्दीच्या तुलनेत खूपच शांत आहे.


 


मनाली, हिमाचल प्रदेश


जर तुम्हाला बर्फाळ थंडीचा त्रास होत नसेल तर मनाली हा एक उत्तम पर्याय आहे. या शहराचा हवामान रेटिंग AQI 27 आहे.  मनाली हे पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात. हिवाळ्यात येथे हिमवर्षाव देखील होतो. अशा परिस्थितीत हिंडणे आणि मोकळा श्वास घेण्यासाठी हे ठिकाण खूप चांगले आहे.


 


शिलाँग


मेघालयची राजधानी शिलाँगचा हवामान रेटिंग AQI 40 आहे. शिवाय, हे एक सुंदर हिल स्टेशन देखील आहे. हे शहर सुंदर लँडस्केप आणि आल्हाददायक हवामानासाठी प्रसिद्ध आहे. डोलणाऱ्या टेकड्या, कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार पाइन जंगलांनी वेढलेले शिलॉन्ग एक प्रसन्न वातावरण देते.


 


कुल्लू, हिमाचल प्रदेश


कुल्लूची हवेची गुणवत्ता पातळी 50 आहे. हे शहर सुंदर पर्वत आणि घनदाट जंगलांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही सहलीचे नियोजन करू शकता आणि सुंदर बियास नदी देखील पाहू शकता.


 


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही.)


Travel : कुठं कुठं जायचं 'स्वस्तात' फिरायला! भारतीय रेल्वेचे 'हे' सर्वात स्वस्त पॅकेज, वाट कसली बघताय? एकदा पाहाच