Multibagger Stock : शेअर मार्केटमधील बिग बुल राकेश झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलिओकडे अनेकांचे लक्ष असते. त्यांच्या पोर्टफोलिओतील स्टॉक कशी कामगिरी करतो, याचेही अनेकजण विश्लेषण करतात. राकेश झुनझुनवाला यांच्याकडील हा स्टॉक 125 टक्क्यांनी वधारला आहे. राकेश झुनझुनवाला यांच्याकडे नॅशनल अॅल्यूमिनियम लिमिटेड कंपनीचे (NALCO) 1.36 टक्के भागिदारी आहे.
'नाल्को'ने 30 सप्टेंबर रोजी संपलेल्या तिमाहीतील एकत्रित नफ्यात सात पटीने वाढ नोंदवली असून ती 747.8 कोटी रुपये इतकी आहे. जवळपास एका वर्षापूर्वी या कालावधीत ही रक्कम 107.27 कोटी इतकी होती. नाल्को खाण मंत्रालयाच्या अखत्यारीत असून नवरत्न कंपनी आहे. नाल्को खनन, धातू आणि ऊर्जा या क्षेत्रात एकत्रित आणि वैविध्यपूर्ण काम केले आहे.
राकेश झुनझुनवाला यांच्याकडे सप्टेंबर 2021 च्या अखेरपर्यंत नाल्कोची 1.36 टक्के भागिदारी होती. नाल्कोच्या शेअरने या वर्षी मल्टिबॅगर परतावा दिला आहे. या स्टॉकमध्ये वर्ष 2021 मध्ये 125 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवण्यात आली. शेअर बाजारातील तज्ज्ञ स्टॉककडे सकारात्मकपणे पाहत आहे.
फिलीप कॅपिटलच्या विश्लेषकांनी अॅल्यूमिनियमची मागणी आणि पुरवठा यावर सकारात्मक दृष्टीकोन व्यक्त केला आहे. नाल्कोच्या शेअर खरेदी करण्याची शिफारस केली असून 115 रुपयांचे लक्ष्य किंमत ठरवले आहे.
शेअरइंडियाने म्हटले की, नजीकच्या काळात अॅल्यूमिनियमच्या मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील तिमाहीत नाल्कोचे निकाल सकारात्मक असण्याची शक्यता आहे. नाल्कोच्या शेअरमध्ये सध्याच्या किंमतीपेक्षा आणखी 20 टक्के वाढ होऊ शकते असा अंदाजही त्यांनी वर्तवला.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)
संबंधित वृत्त:
Multibagger stocks: आयटी क्षेत्रातील 'या' स्टॉकने दीड वर्षात एक लाखाचे केले 15 लाख रुपये
Multibagger Stock 2021: या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल! सहा महिन्यांत 108.93 टक्के परतावा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha