Multibagger stocks: शेअर मार्केटमधील Multibagger stocksने गुंतवणुकदारांना चांगलेच मालामाल केले आहे. आयटी क्षेत्रातील या मल्टिबॅगर स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. या स्टॉकने गुंतवणुकदारांना तब्बल 1500 टक्के परतावा दिला आहे. या आयटी कंपनीतील स्टॉकची किंमत 172 हून वधारून 2871 इतकी झाली आहे. मास्टेक लिमिटेड (Mastek Ltd)या स्टॉकने ही किमया साधली आहे. 


पाच वर्षात 2,054.25 टक्के परतावा 


या शेअरने मागील दीड वर्षात गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. मागील पाच वर्षात या स्टॉकने 2,054.25 टक्के परतावा दिला आहे. तर, मागील एक वर्षात 173.30 टक्के आणि सहा महिन्यात 52.01 टक्के परतावा दिला आहे. मागील एक वर्षात हा शेअर  1,806.55 रुपयांनी वाढला आहे. 


शेअर दरात 2677 रुपयांनी वाढ


27 मार्च 2020 मध्ये या शेअरचा दर 172.35 रुपये होता. शुक्रवारी, 12 नोव्हेंबर 2021 कंपनीचा स्टॉक  2,849.00 रुपयांवर बंद झाला. शुक्रवारी या शेअरचा दर 2,857.55 इतका उच्चांकी नोंदवण्यात आला. कंपनीचा शेअर 2677 रुपयांनी वाढला. 


एक लाखाचे झाले असते 15 लाख


या स्टॉकचा शेअर दर 52 आठवड्याचा सर्वाधिक दर 3669.00 रुपये इतका होता. तर, 52 आठवड्यातील सर्वात कमी दर ह 802.20 रुपये इतका होता. जर, तुम्ही मार्च 2020 मध्ये या स्टॉकमध्ये एक लाखांची गुंतवणूक केली असती तर ते एक लाख रुपये हे 15 लाख रुपये झाले असते. 


शुक्रवारी शेअर दर वधारला


शुक्रवारी सलग तीन दिवसाच्या घसरणीनंतर या शेअरचा दर वधारल्याचे दिसून आले. मास्टेक शेअर 100 आणि 200 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजपेक्षा अधिक 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या मुव्हिंग एव्हरेजने व्यवसाय करत आहे. 


ब्रोकरेज फर्म काय म्हणतात


ब्रोकरेज संस्थांनुसार, या शेअरचा दर 3300 रुपये प्रति शेअर इतका होऊ शकतो. या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळू शकतो असा ब्रोकरेज संस्थांनी अंदाज वर्तवला आहे. बीएसईवर आयटी कंपनीचा मार्केट कॅप वाढून 8375 कोटी झाला आहे. या वर्षाच्या सुरुवातीपासून आयटीचा शेअर 148.4 टक्के इतका वाढला आहे. एका वर्षात 217.43 टक्के इतका वाढला. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने दिली जात आहे. बाजारातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूक करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. ABPLive.com च्या माध्यमातून येथे कोणालाही पैसे गुंतवण्याचा सल्ला दिला जात नाही.)


संबंधित वृत्त:


Multibagger Stock 2021: या शेअरने गुंतवणुकदारांना केले मालामाल! सहा महिन्यांत 108.93 टक्के परतावा


'या' IPO ने तोडले सब्सक्रिप्शनचे उच्चांक; गुंतवणुकदारांची मोठी अपेक्षा