Multibagger Stock Tips: शेअर बाजारात गुंतवणूक करताना योग्य शेअर निवडणे महत्वाचे असते. काही शेअर तर असे आहेत की त्यांनी अनेकांना मालामाल केलं आहे. मात्र जास्त नफा मिळवायचा असेल तर शेअर जास्त काळ होल्ड करणे गरजेचं आहे. असे अनेक शेअर आहेत ज्यामध्ये लोकांना 1 लाख रुपये गुंतवले आणि त्याचे कोट्यवधी रुपये झाले. आज अशा तीन शेअर बद्दल जाणून घेऊया ज्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे गेल्या 20 वर्षात 1400 पटीने जास्त केले आहेत.


आयशर मोटर्स (Eicher Motors)


- आयरश मोटर्सच्या एका  शेअरची किंमत 31 ऑगस्ट 2001 रोजी 1.77 रुपये होती.
- 26 ऑगस्ट 2021 रोजी या शेअरची किंमत 32.15 रुपयांनी वाढून 2579.05 रुपयांवर बंद झाली.
- आयशर मोटर्सच्या स्टॉकने 20 वर्षांत गुंतवणूकदारांना 145609 टक्के रिटर्न्स दिले आणि गुंतवणूकदारांचे पैसे 1456 पट जास्त झाले.


एशियन पेंट्स (Asian Paints)


- एशियन पेंट्सच्या एका शेअरची किंमत 31 ऑगस्ट 2001 रोजी 17.63 रुपये होती.
- 26 ऑगस्ट 2021 रोजी हे शेअर 2.95 रुपयांनी पडून झाले आणि 3043 रुपयांवर बंद झाले.
- एशियन पेंट्सच्या स्टॉकने 20 वर्षांत 1716 टक्के रिटर्न्स गुंतवणूकदारांना दिले आहेत. 


इन्फोसिस (Infosys)


- इन्फोसिसच्या एका शेअरची किंमत 31 ऑगस्ट 2001 रोजी 55.29 रुपये होती.
- 26 ऑगस्ट रोजी या शेअरची किंमत 16.45 रुपयांनी मजबूत झाली आहे आणि 1737.20 रुपयांवर बंद झाली आहे.
- या स्टॉकने 20 वर्षांत 3041 टक्के परतावा दिला आणि गुंतवणूकदारांचे पैसे 30 पट जास्त केले.


इतर बातम्या