नवी दिल्ली : शेअर बाजार पैसे झपाट्याने वाढवण्याचा गुंतवणुकीचा पर्याय आहे. मात्र यासाठी शेअर मार्केटचा अभ्यास महत्त्वाचा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर शेअर बाजारात गुंतवणूकदारांनी मोठा नफा कमावला आहे. 2021 अनेक स्टॉक्समध्ये मोठी मुसंडी पाहायला मिळाली. असाच एक शेअर आहे ज्याने गुंतवणूकदारांना सुमारे 349 टक्के रिटर्न्स दिले आहेत. शेअर मार्केटमधील मल्टीबॅगर शेअर 2021 ची यादी पाहिल्यास यात सर्व प्रकारचे स्मॉलकॅप आणि मिडकॅप शेअर्सचा समावेश आहे. बजाज फायनान्स देखील यापैकी एक आहे. बजाज फायनान्सने गुंतवणूकदारांना अपेक्षेपेक्षा अनेक पटींनी अधिक रिटर्स दिले आहेत.
12 वर्षांपूर्वी बजाज फायनान्स स्टॉकची किंमत फक्त 17.64 रुपये होती. याच स्टॉकची किंमत 2021 मध्ये 6,177 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. अशाप्रकारे, गेल्या 12 वर्षांत या शेअरमध्ये सुमारे 349 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
तुमच्या खिशातील '786' नंबरची नोट तुम्हाला बनवेल लखपती, कसं?
शेअर 2002 मध्ये लिस्टेड
बजाज फायनान्सचा शेअर एनएसईवर 5 जुलै 2002 रोजी लिस्ट झाला होता आणि त्या दिवशी त्याची किंमत 5.75 रुपये होती. त्यानंतर 2008 पर्यंत या स्टॉकची किंमत सुमारे 45 रुपयांपर्यंत वाढली होती. गेल्या 12 वर्षात या शेअरचे मूल्य जवळजवळ 350 पट वाढले आहे. त्याचबरोबर, मागील 5 वर्षांच्या चार्टवर नजर टाकल्यास या स्टॉकने गुंतवणूकदारांना 495 टक्क्यांहून अधिक रिटर्न दिले आहेत. त्याचप्रमाणे मागील सहा महिन्यांत या शेअरने आपल्या शेअर होल्डर्सना 25 टक्क्यांहून अधिक रिटर्न्स दिले आहेत.
आपल्या PF च्या एका हिस्स्याची InvITs मध्ये गुंतवणूक होणार; जाणून घ्या काय आहे InvITs
1 लाखाचे झाले 3.5 कोटी
सोप्या पद्धतीने सांगायचं तर जर या शेअरमध्ये कुणी सहा महिन्यापूर्वी गुंतवणूक केली असती तर त्या एक लाखाचे सव्वा लाख झाले असते. जर एखाद्या गुंतवणूकदाराने एका वर्षापूर्वी जर या शेअरमध्ये 1 लाख गुंतवणूक केली असेल तर त्याचे आज 1.95 लाख झाले असते. मात्र या पलिकडे एखाद्या गुंतवणूकदाराने 12 वर्षांपूर्वी या बजाज फायनान्सचे 1 लाखाचे शेअर विकत घेतले असते तर आज त्यांची किंमत जवळपास 3.5 कोटी असती.