मुंबई : कोरोना संकटानामुळे अनेकांवर मोठं आर्थिक संकट कोसळलंय. मात्र शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या काहींना काही शेअरमुळे लॉटरी लागली आहे. यामध्ये गोदावरी पॉवरच्या (Godawari Power) शेअरचा समावेश आहे. गेल्या एका वर्षात गोदावरी पॉवरने आपल्या गुंतवणूकदारांना श्रीमंत केले आहे. वर्षभरापूर्वी गुंतवणूकदारांनी या कंपनीत 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असेल तर ती आता 9.96 लाख रुपये झाली आहे. म्हणजेच या कंपनीचे शेअर्स 1 वर्षात 10 पट वाढले आहेत.


गेल्या 1 वर्षात गोदावरी पॉवर स्टॉक 896 टक्क्यांनी वाढला आहे. 15 जून 2020 रोजी या शेअरची 156.80 रुपये होती, जी आज वाढून 1561.95 रुपये झाली आहे. तर या काळात सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीमध्ये (Nifty) फक्त 58.95 टक्के इतका फायदा झाला आहे.


बीएसई (BSE) वर गोदावरी पॉवरचे शेअर्स आज 1561.95 रुपयांच्या 52 आठवड्यांतील उच्चांकापर्यंत पोहोचले. सुरुवातीला  त्याचा समभाग कमी झाला आणि आज कंपनीचे शेअर्स 4.77 टक्क्यांनी घसरून 1430.75 रुपयांवर बंद झाले. आज 7 सत्रानंतर कंपनीच्या समभागात घट झाली आहे. मागील 5 सत्रात कंपनीने 43 टक्के परतावा दिला आहे.


गोदावरी पॉवरचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसाच्या त्यांच्या डेली मूव्हिंग एव्हरेज (DMA) च्या वर ट्रेड करत आहेत. कंपनीच्या समभागात झालेल्या या तेजीमुळे त्याची मार्केट कॅप 5004 कोटी रुपयांवर गेली आहे. या महिन्यात आतापर्यंत त्याचे समभाग 53 टक्क्यांनी वाढले आहेत.


छत्तीसगडच्या या वीज कंपनीमो परतावा देण्याच्या बाबतीत आपल्या सर्व प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा खूप मागे सोडलं आहे. गेल्या एक वर्षात जेएसडब्ल्यू स्टीलच्या (JSW steel) शेअर्समध्ये 59 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर टाटा स्टीलच्या शेअर्समध्ये (Tata Steel) 283.74 टक्के, SAIL चे शेअर्समध्ये 371 टक्के आणि हिंडाल्को इंडस्ट्रीजमध्ये 169 टक्क्यांनी वाढ झाली आहे.


गोदावरी पॉवरच्या शेअर्समध्ये मजबूत फायनान्शियल रिझल्ट्समुळे वाढ झाली आहे. FY21 च्या Q4 मध्ये कंपनीचा नेट प्रॉफिट 879 टक्के वाढून 326.95 कोटी रुपये झाला आहे, जो मागील वर्षी याच तिमाहीत केवळ 33.37 कोटी रुपये होता. कंपनीच्या विक्रीत 60 टक्के वाढ झाली असून ती 1262.25 कोटी रुपये आहे.