मुंबई : जर तुम्हाला नोट्स किंवा नाणी गोळा करण्याचा छंद असल्यास, आता आपल्या छंदाला कमाईत रुपांतरित करण्याची वेळ आली आहे. तुमचा हा छंद 'लाख' मोलाचा ठरु शकतो. त्यामुळे तु्म्ही तुमच्या नोटा आणि नाणी शोधून ठेवा, कारण त्यामुळे तुम्ही लक्षाधीश बनू शकता.
आपल्याकडे नोटांचा संग्रह असल्यास आणि त्यामध्ये 786 क्रमांकासह एक नोट असल्यास उशीर करु नका आणि पटकन Ebay वेबसाइटवर जा आणि या नोटेच्या बदल्यात पैसे कमवा. भारतीय चलनाच्या दुर्मिळ नोटांचा लिलाव ई-बे साईटवर केला जातो. ईबे साईटवर नेहमीच नोटांसाठी बोली लावली जाते. या बोलीमध्ये कोणताही सामान्य व्यक्ती भाग घेऊ शकतो. ज्यांच्याकडे 786 अंकी नोट आहे त्यांनाही एका बोलीवर हजारो किंवा लाखो रुपयांपर्यंत रक्कम मिळू शकते. इ-बे शिवाय कॉईन बाजार (Coinbazzar.com) साईटवरही तुम्ही तुमच्या नोटेची विक्री करु शकता. Ebay, कॉईनबाजार, इंडियन ओल्ड कॉईन आणि क्लिक इंडिया यासारख्या साईट्सवर लोक या नोटा, नाणी शोधत असतात. अशा नोटा आणि नाण्यांची बोली देखील लावली जाते.
Old Note, Coin : एक रुपयाची जुनी नोट तुम्हाला बनवू शकते लखपती; कसं? वाचा सविस्तर
मुस्लीम समाजामध्ये 786 हा आकडा भाग्यवान मानला जातो. त्यामुळेचे या नंबरची नोट खरेदी करण्यासाठी ते चांगले पैसे देण्यास देखील तयार असतात. आपल्याकडेही 786 क्रमांकाची नोट असल्यास त्याची आपणास चांगली रक्कम मिळू शकते.
जुन्या नोटा कुठे विकायच्या?
- आधी www.ebay.com या साईटवर क्लिक करा.
- होमपेजवर रजिस्टर करण्यासाठी क्लिक करा आणि सेलर म्हणून स्वत:चं रजिस्ट्रेशन करा.
- आपल्या नोटेचा एक छान फोटो काढा आणि साईटवर अपलोड करा. जुन्या नोटा आणि नाणी खरेदी करण्यासाठी अनेक लोक या प्लॅटफॉर्मचा वापर करतात.
नोट खरेदी करण्यास इच्छुक असलेले लोक आपली माहिती पाहतील आणि आपल्याशी संपर्क साधतील. आपण त्यांच्याशी बोलून आपली नोट विकू शकता.