मुंबई : भारतीय शेअर बाजार (Share Market) सध्या विक्रमी उच्चांकावर आहेत. सेन्सेक्स (Sensex) आणि निफ्टीसह (Nifty) बर्‍याच कंपन्यांचे शेअर्स ऑल टाईन हायवर पोहोचले आहेत. बीएसई (BSE) आणि एनएसईवर (NSE) लिस्टेड बहुतेक कंपन्यांचे शेअर 2000 रुपयांच्या खाली आहेत. पण अशाही अनेक कंपन्या आहेत की ज्यांची स्टॉक प्राईज 10,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.


शेअर्सच्या जास्त किंमतींचा अर्थ असा नाही की त्या कंपन्या गुंतवणूकीसाठी अधिक चांगल्या आहेत. परंतु जास्त किंमतींचा अर्थ असाही नाही की त्या कंपन्यांना पूर्णपणे टाळावे. कोणत्याही स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी त्या कंपनीची आर्थिक स्थिती, फंडामेंटल्स, मॅनेजमेंट, बिजनेस स्टॅटर्जी नक्की पाहावी. सध्या भारतातील 6 सर्वात महाग स्टॉक कोणते आहेत याची माहिती घेऊयात.


MRF


मद्रास रबर फॅक्टरी म्हणजेच एमआरएफची शेअर किंमत सध्या 80,850 रुपये आहे. हा भारतातील सर्वात महागडा स्टॉक आहे. मद्रासमधील लहान खेळण्यांच्या दुकानापासून सुरू झालेला एमआरएफचा प्रवास असामान्य आहे. कंपनी टायरसह पेंट्स, क्रीडा वस्तू देखील बनवते. एमआरएफने कधीही आपले शेअर्स विभाजित केले नाहीत आणि त्याची फेस वॅल्यू10 रुपये आहे. नोव्हेंबर 2012 मध्ये कंपनीच्या शेआर्सची किंमत फक्त 10000 रुपये होती. तर फेब्रुवारी 2021 मध्ये ती किंमत ऑल टाईम हाय 98,575 पर्यंत पोहोचली होती. गेल्या वर्षभरात कंपनीने 25.3 टक्के रिटर्न्स दिले आहेत.


हनीवेल ऑटोमेशन (Honeywel Automation)


हनीवेल ऑटोमेशनच्या शेअरी किंमत सध्या सुमारे 40,000 रुपये आहे. कंपनी अमेरिकेतमध्ये इंटिग्रेटेड ऑटोमेशन आणि सॉफ्टवेअर सोल्यूशन सेवा पुरवते आणि तेथील बाजारपेठेतील अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीची सुरुवात टाटा समूह आणि अमेरिकन कंपनी हनीवेल यांनी 1987 मध्ये जॉईंट वेन्चरने केली होती, जी 2004 मध्ये संपली. 15 मार्च 2021 रोजी कंपनीचे शेअर्स ऑल टाईम हाय 49,805 रुपयांवर पोहोचले होते. कंपनीने गेल्या 5 वर्षात 400 टक्के पेक्षा जास्त रिटर्न्स दिले आहेत. कंपनीची मार्केट कॅप 355.9 अब्ज आहे.


श्री सिमेंट्स (Shree Cements)
 
श्री सिमेंट्स हा भारतातील तिसरा सर्वात महागडा स्टॉक आहे. ही भारतातील सर्वात मोठी सिमेंट कंपनी आहे. कंपनी श्री जंगरोधक सिमेंट, बांगर सिमेंट आणि रॉकस्ट्राँग सिमेंट या ब्रँड नेमने सिमेंटची विक्री करते. कंपनीची मार्केट कॅप एक लाख कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सनी एक वर्षात 26.5 टक्के रिटर्न्स दिले आहेत.


पेज इंडस्ट्रीज (Page Industries)


पेज इंडस्ट्रीज भारत, बांग्लादेश, श्रीलंका, युएई आणि नेपाळमध्ये Jockey चे प्रोडक्ट मॅन्युफॅक्टरिंग, व्यापार आणि मार्केटिंग करतात. या कंपनीची शेअर प्राईज सध्या 29,500 रुपयांहून अधिक आहे. 


3 एम इंडिया (3M India)


3 एम इंडियाची स्थापना 1987 मध्ये झाली आणि कंपनीचा व्यवसाय बर्‍याच प्रकारात वैविध्यपूर्ण आहे. त्याची शेअर किंमत सध्या 25,000 रुपयांच्या वर आहे. कंपनी Scotch Brite, Scotch Tapes तसेच पेंट प्रोटेक्शन फिल्म, विंडो फिल्म इत्यादींचे उत्पादन करते. कंपनीची  मार्केट कॅप 282.8 अब्ज आहे. कंपनीने 1 वर्षात 31.27 टक्के आणि 5 वर्षात 107 टक्के रिटर्न्स दिले आहेत.


नेस्ले इंडिया (Nestle India)


नेस्ले इंडियाने 1961 मध्ये भारतात प्रवेश केला आणि स्वत: चा कारखाना स्थापन केला. ही कंपनी फूड सेगमेंटमध्ये लीडर कंपनी आहे. सध्या या कंपनीच्या शेअरची किंमत 17,500 रुपये आहे आणि हा देशातील सहावा सर्वात महागडा स्टॉक आहे. कंपनीची मार्केट कॅप 1.70 लाख कोटी रुपये आहेत. कंपनीने 1 वर्षात केवळ 5 टक्के रिटर्न्स तर 5 वर्षात 170 टक्के रिटर्न्स दिले आहेत.