एक्स्प्लोर

Ladki Bahin E-KYC : लाडक्या बहिणींसमोर नवी समस्या, पोर्टलवरुन ओटीपी येत नसल्यानं ई-केवायसी करण्यात अडचणी

Ladki Bahin E-KYC : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

परभणी : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांनी ई- केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केलं आहे. या आवाहनानंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई केवायसीसाठी आवश्यक असलेला ओटीपी येत नसल्यानं लाडक्या बहिणींसमोर अडचणी 

Ladki Bahin EKYC Problems : लाडकी बहीण ई- केवायसी करताना अडचणी 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पारदर्शकतेसाठी आणि लाभार्थ्यांना सातत्यानं लाभ मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास सांगितलं आहे.  त्यानुसार अनेकांनी  ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलला भेट देऊन ई केवायसी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधार क्रमांक नोंदवल्यानंतर जो ओटीपी येणं आवश्यक आहे तो येत नसल्यानं लाडक्या बहिणींसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. 

ई- केवायसी करताना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक द्यावा लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पहिल्यांदा स्वत:चा आधार क्रमांक नोंदवावा लागेल. त्यानंतर  ई-केवायसी प्रक्रिया पुढं नेल्यानंतर पती किंवा वडील यांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणीकरण करावं लागेल. आधार क्रमांक नोंदवल्यानंतर पती किंवा वडिलांच्या मोबाईल नंबरवर येणारा ओटीपी क्रमांक ई-केवायसीसाठी नोंदवावा लागेल.  यानंतर पात्र लाभार्थ्यानं घोषणापत्र मान्य असल्याचं नोंदवावं लागेल. त्यामध्ये त्या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती शासकीय नोकरीत नसल्याचं आणि कुटुंबातील केवळ 2 व्यक्ती लाभ घेत असल्याचं घोषणापत्राद्वारे जाहीर करावं लागेल. 

सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करावी लागणार

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल ई-केवायसी संदर्भातील घोषणा केली. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करताना म्हटलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील २ महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती. ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना 14 हप्त्यांची रक्कम मिळालेली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
तुमचं खातं कोणत्या बँकेत? HDFC बँकेच्या ग्राहकांना मोठा दिलासा, व्याजदरात केली कपात
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
वर्षभरात साखरेच्या दरात 20 टक्के वाढ, साखर कंपन्यांच्या शेअर्समध्येही तेजी, दरात आणखी वाढ होणार का?
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
सर्वाधिक सुट्ट्या मिळणाऱ्या भारतातील सरकारी नोकऱ्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Gold Silver Rate Today: सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर
सोन्याच्या दरात मोठी वाढ; पुन्हा गाठला दीड लाखांचा टप्पा, चांदीमध्येही तेजी, जाणून घ्या आजचे दर

व्हिडीओ

Devendra Fadnavis on Nana Patekar Passes Away : भाऊ, मार्गदर्शक, मित्र हरपला; फडणवीस भावुक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Nana Patekar Passes Away : अभिनेते नाना पाटेकर यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन
Rahul Gandhi Protest : राहुल गांधी, प्रियांका गांधी पोलिसांच्या ताब्यात UNCUT VIDEO
Rahul Gandhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा, पोलिसांनी राहुल गांधींना पुन्हा उचललं
Sunetra Pawar : दादा खूप मोठ्या मनाचे होते,मी नाही; सुनेत्रा पवारांचा बंडखोरांना इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune MPSC Student Protest: तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
तातडीने जागा रिकामी करा, पुणे पोलिसांचे आदेश; MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा धक्का, एस. एम. जोशी पुलावरील आंदोलनाची परवानगी नाकारली
Nashik Accident News: रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
रस्त्याच्या मधोमध भलामोठा खड्डा, अंधारात अंदाज चुकला अन् दुचाकीसह पडले; नाशिकमध्ये 61 वर्षीय वृद्धाचा मृत्यू
Jay Pawar on Yugendra Pawar : युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
युगेंद्र पवारांनी सोमेश्वरसाठी आपण एकत्र यायचं का विचारलं होतं; पार्थदादांनी सांगितलं की, 'युगेंद्र, आमचे कार्यकर्ते...', जय पवारांनी सांगितली इनसाईड स्टोरी
Raj Thackeray: नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
नानांनी पडद्यावर उभा केलेला तो माणूस अजूनही आपल्या आजूबाजूला, त्याचा राग, अस्वस्थता, अपमान, धडपड आहे; राज ठाकरेंनी नाना पाटेकरांच्या असंख्य भावनांमधील 'मनस्वी' पैलू मांडले
Bhandara News: पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
पालकमंत्र्यांसमोर रडत-रडत व्यथा मांडली, अधिकाऱ्यांकडून फाईल्स फेकल्याची तक्रार; दोनच दिवसांत भंडाऱ्यातील शेतकऱ्याने टोकाचं पाऊल उचललं
Sayaji Shinde On Nana Patekar Passed Away : बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
बातम्यांवर विश्वास बसेना, 7 वाजता माहिती कळली अन्..., सुजलेले डोळे, शब्दही सुचेना, नाना पाटेकरांच्या निधनानंतर सयाजी शिंदेंना मोठा धक्का
Nana Patekar: असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
असा 'नटसम्राट' होणे नाही! नानांकडून 'प्रहार'मधील आर्मी मेजर साकारण्यासाठी मराठा लाइट इन्फंट्रीमध्ये प्रशिक्षण अन् कारगिल युद्धातही सहभाग
Popatrao Pawar on Nana Patekar: नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
नाना पाटेकरांच्या नाम फाउंडेशनची सुरुवात झालेल्या हिवरेबाजारचे पोपटराव पवार हळहळले; म्हणाले, 'आमचं या आठवड्यात नानाजींना पुण्यामध्ये भेटायचं निश्चित झालं होतं, पण दुर्दैव...'
Embed widget