Sangli Loksabha Election: सांगली लोकसभा मतदारसंघाची (Sangli Loksabha Election) सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कारण या मतदारसंघातून महाविकास आघाडीत थोडी नाराजी पाहायला मिळत आहे. कारण महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) निवडणूक लढवत आहेत. तर काँग्रेसचे नेते विशाल पाटील (Vishal Patil) यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या सर्व घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी जाहीर वक्तव्य केलं. सांगलीच्या उमेदवारीवरुन सर्वांचा रोख माझ्यावर होता. पण माझा काहीही संबंध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.


नेमकं काय म्हणाले जयंत पाटील? 


आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीचे सर्व दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी जयंत पाटील देखील उपस्थित होते. सांगली लोकसभेच्या जागेचा विषय हा उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा आहे. उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आले की पुन्हा माघार नसते असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे. सांगलीच्या उमेदवारीवरुन सर्वांचा रोख माझ्यावर होता. पण माझा काहीही संबध नसल्याचे जयंत पाटील यावेळी म्हणाले.


ठाकरेंचा पक्ष फोडून पोट भरलं नाही म्हणून आमचा पक्षही फोडला


दरम्यान, यावेळी जंयत पाटील यांनी भाजपवर देखील जोरदार टीका केली. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फोडून पोट भरले नाही म्हणून त्यांनी आमचा राष्ट्रवादी पक्षही फोडला असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली. सांगलीच्या उमेदवारी वरून सर्वांचा रोख माझ्यावर होता, माझा काही संबध नाही. उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचा हा विषय आहे. उद्धव ठाकरेंच्या एकदा डोक्यात आले की पुन्हा माघार नसते असे जयंत पाटील म्हणाले. एकास एक निवडणूक झाली तर आजच निकाल लागला असे समजा असंही जयंत पाटील म्हणाले. 


सांगली लोकसभेच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता


सांगली लोकसभेच्या मुद्यावरुन महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीकडून तिकीट मिळावे म्हणून प्रयत्न केले होते. मात्र, त्यांना काही तिकीट मिळाले नाही. ही जागा ठाकरे गटाला सोडण्याचा निर्णय झाला. त्यामुळं या जागेवरुन चंद्रहार पाटील यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे. त्यामुळं विशाल पाटील यांनी देखील आता लढयाचंच असा निर्णय घेतला. अखेर त्यांनी देखील आला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आज चंद्रहार पाटील यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळं आता विशाल पाटील अर्ज माघारी घेणार का? की निवडणूक लढवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Sangli Loksabha : सांगलीच्या जागेवरुन कॉंग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत मनोमिलन? संजय राऊत पोहोचताच घडामोडी सुरु!