चंद्रपूर:  चंद्रपूर शहरातील हिंदी सिटी हायस्कूल इथल्या मतदान केंद्रावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राडा केला. मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर (Pratibha Dhanorkar)  यांच्या नावापुढे कॅन्सल असा शिक्का मारण्यात आल्याने कार्यकर्ते संतप्त झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत सुधीर मुनगंटीवार यांचा निषेध केला. नेमका काँग्रेस उमेदवाराच्या नावावरच कॅन्सलचा शिक्का कसा मारला, असा सवाल करत कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. अचानक झालेल्या या गोंधळाने केंद्रावर काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. 


मतदान केंद्रावर उमेदवारांच्या यादीवर काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांच्या नावापुढे कॅन्सलचा शिका मारल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. मतदान केंद्राच्या मुर्दाबाद मुर्दाबादच्या घोषणा देत होते. आम्ही उमेदवारी मागे घेतली नाही मग कॅन्सलच्या शिक्का का असा संतप्त सवाल कार्यकर्त्यांनी विचारला आहे. हे षडयंत्र असून भाजपाचे अपयश आहे. सत्तेचा माज आहे. मतदान केंद्रावर असलेल्या अधिकारी याला जबाबदार असून त्या अधिकाऱ्याला बडतर्फ केले पहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. ही लोकशाहीचा हत्या आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.   


विदर्भातील पाच जागांसाठी आज मतदान


विदर्भातील पाच जागांसाठी आज मतदान होतंय. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालीये.. उमेदवारांनींही आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे. नागपुरात भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. चंद्रपूरच्या मविआच्या उमेदवार प्रतिभा धानोकर  आणि भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी मतदान केलं.  तर दुसरीकडे, रामटेक मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राजू पारवे आणि मविआचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांनी देखील मतदान केलं. भंडाऱ्यातील मविआचे उमेदवार प्रशांत पडोळे आणि भाजप उमेदवार सुनील मेंढे यांनीही मतदान केलं. तर गडचिरोली-चिमूरचे भाजप उमेदवार अशोक नेते आणि काँग्रेस उमेदवार नामदेव किरसान यांनींही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. 


मतदार यादीतून नावच गहाळ


नागपुरात मतदार मतदान केंद्रावर गेल्यानंतर त्यांचं नावचं मतदान यादीत नसल्याची बाब समोर आलीय. मतदार यादीतून नावच गहाळ झाल्यानं मतदारांना मतदान न करताच परताव लागले आहे. 


हे ही वाचा :


BLOG : पहिल्या टप्प्यातील 4 मतदारसंघाचा माझा अंदाज, कोण कुठे जिंकणार?