Mukesh Ambani Reliance Industries Company: मुंबई : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) त्यांच्या साम्राज्यातील एक कंपनी विकणार आहे. अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीज (Reliance Industries) लिमिटेडनं आपली एक कंपनी विकण्याची घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या (Reliance Industries Ltd) घोषणेनंतर मार्केटमध्येही चर्चांना उधाण आलं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार, REC सोलर नॉर्वे AS ला ओस्लो लिस्टिड Alkem AS ला सुमारे 22 अमेरिकन दशलक्ष डॉलर्सना विकणार आहे. REC नॉर्वे ही REC सोलर होल्डिंगची पूर्ण मालकी असलेली कंपनी आहे. ही कंपनी स्कॅन्डिनेव्हियन देशात पॉलिसिलिकॉनचं उत्पादन करते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिलायन्सची सब्सिडरी असलेल्या कपनीनं ऑक्टोबर 2021 मध्ये ही कंपनी खरेदी केली होती. रिलायन्सच्या युनिटनं ही कंपनी 771 दशलक्ष डॉलर्सच्या उलाढालीवर विकत घेतली होती. रिलायन्सच्या कंपनीनं तेल ते रिटेल समूहात आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी ही कंपनी खरेदी केली होती.
रिलायन्सच्या सब्सिडरी कंपनीचा करार
RIL ने आपल्या स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये माहिती दिली की, REC Solar Holdings AS, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. त्यांनी 14 जानेवारी 2024 रोजी प्रति शेअर 100 रुपये दरानं शेअर्सच्या विक्रीसाठी Alkem ASA सोबत करार केला आहे. REC Solar Norway AS ला 22 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सना विकण्यासाठी करार करण्यात आला आहे.
रिलायन्ससाठी किती फायद्याचा ठरला व्यवहार?
2022 मध्ये REC नॉर्वेची उलाढाल नॉर्वेजियन क्रोन 1.1 अब्ज होती आणि 31 डिसेंबर 2022 पर्यंत एकूण मालमत्ता NOK 0.3 अब्ज होती. कंपनीनं 2022-23 या आर्थिक वर्षासाठी रिलायन्सच्या एकत्रित व्यवसाय आणि निव्वळ मूल्यामध्ये 0.08 टक्के आणि 0.03 टक्के योगदान दिलं आहे. ऑक्टोबर 2021 मध्ये, RIL नं यूएस, युरोप, ऑस्ट्रेलिया आणि आशियातील इतरत्र जागतिक स्तरावर हरित ऊर्जा बाजारपेठांमध्ये विस्तार करण्यासाठी चायना नॅशनल ब्लूस्टार ग्रुप कंपनीकडून REC सोलर होल्डिंग्स विकत घेतले आहेत.
कंपनीचं नेमकं काम काय?
महत्त्वाची बाब म्हणजे, या कंपनीची स्थापना 1904 मध्ये झाली होती. Alkem ASA ही सिलिकॉन आधारित कंपनी आहे आणि ती ओस्लो स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध आहे. कंपनीच्या अधिकृत वक्तव्यानुसार, आरईसी नॉर्वे, आरईसी सोलर होल्डिंग्स एएसची पूर्ण मालकीची उपकंपनी, नॉर्वेमध्ये केर्फ-आधारित पॉलिसिलिकॉन तयार करण्याच्या व्यवसायात आहे. ही कंपनी पुढेही पॉलिसिलिकॉन व्यवसाय सुरू ठेवेल.
महत्त्वाच्या इतर बातम्या :