Modi govt schemes, Pradhan Mantri Jeevan Jyoti Bima Yojana : केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत फक्त 330 रुपये भरुन एका वर्षाकरिता दोन लाख रुपायांचा आरोग्य विमा दिला जातो. भारत सरकारची ही योजना लोकप्रिय ठरत असून या योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत 12.12 कोटींहून अधिक लोकांनी नावनोंदणी केली आहे. म्हणजेच या योजनेचा लाभ घेतला आहे. वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागने (DFS) या योजनेसंदर्भात नवीनतम डेटा जारी केला आहे. सामाजिक सुरक्षेशी निगडीत या योजनेचा लाभ सर्वसामान्यांना देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. ही एक फायदेशीर योजना आहे.
नेमकी योजना काय -
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत, 330 रुपयांच्या वार्षिक प्रीमियम वर सामान्य माणसाला 2 लाख रुपयांचा जीवन विमा प्रदान केला जातो. ही प्रीमियम रक्कम दर वर्षी देय तारखेला ग्राहकांच्या बँक खात्यातून आपोआप कापली जाते. तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही दरवर्षी या योजनेचे नूतनीकरण करू शकता. योजनेंतर्गत एक जून ते 31 मे असे एक वर्ष मानले जाते.
कुठे अर्ज कराल -
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत 18 ते 50 वर्षे वयोगटातील लोक ज्यांचे बँक खाते आहे, ते या योजनेत सामील झाल्यावर, त्यांच्या खात्यातून ऑटो-डेबिटसाठी संमती देतात, ते स्वतःची नोंदणी करू शकतात. कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन तुम्ही प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी स्वतःची नोंदणी करू शकता. जेव्हा जेव्हा दावा करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला संबंधित कागदपत्रे बँकेच्या शाखेत जमा करावी लागतील. 330 रुपयांच्या प्रीमियमवर 2 लाख रुपयांचे लाइफ कव्हर एका वर्षासाठी वैध आहे.
दोन लाख रुपये कधी मिळतील -
प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना अंतर्गत, पॉलिसीधारकाचा 18 ते 50 वर्षांच्या दरम्यान मृत्यू झाल्यानंतर, या योजनेंतर्गत सरकारकडून दिलेली 2 लाख रुपयांची रक्कम पॉलिसीधारकाच्या कुटुंबाला दिली जाते, जेणेकरून, अशा परिस्थितीत आपत्ती, त्यावेळी त्यांना आर्थिक मदत उपलब्ध होऊ शकते.
विमा योजनेची कागदपत्रे -
अर्जदाराचे आधार कार्ड
ओळखपत्र
बँक खाते पासबुक
मोबाईल नंबर
पासपोर्ट आकाराचा फोटो
या योजनेची वैशिष्ट्ये -
– वयाच्या 55 व्या वर्षापर्यंत कव्हर देते.
– कोणत्याही कारणामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यावर त्याच्या नामनिर्देशित व्यक्तीला 2 लाख रुपयांची रक्कम मिळते.
– 18 ते 50 वर्षे वयोगटातील नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
– वार्षिक हफ्ता फक्त 330 रुपये आहे.
– जर कोणी वर्षाच्या मध्ये योजना सुरू केली तर खात्यामधून पैसे वजा करण्याच्या तारखेपासून नाही तर प्रीमियम अर्ज करण्याच्या तारखेच्या आधारे ठरवला जाईल.
- प्रधानमंत्री जीवन ज्योति बीमा योजना ही प्रत्येक वर्षी रिन्यू करावी लागते.
- या योजनेत सहभागी झाल्यास पंचेचाळीस दिवसापर्यंत आपल्याला क्लेम करता येत नाही 45 दिवसानंतर आपल्याला क्लेम करता येतो
नियम आणि अटी काय आहेत?
– एखादा व्यक्ती फक्त विमा कंपनी आणि बँक खात्याशी संबंधित असू शकते.
– याचा क्लेम करण्यासाठी, विमाधारकाचे नॉमिनी/उत्तराधिकारी, ज्या व्यक्तीकडे विम्याचे खाते आहे अशा बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. यासाठी विमाधारकाचे डेथ सर्टिफिकेट आणि क्लेम फॉर्म जमा करावा लागतो. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हक्काची रक्कम नामनिर्देशित व्यक्तीच्या बँक खात्यात वर्ग केली जाईल.
– योजनेच्या 55 वर्षानंतर विमा आपोआप संपेल.
– ही एक फक्त मदतीची विमा पॉलिसी आहे, म्हणून फक्त मृत्यूचा समावेश आहे.
– मॅच्युरिटी बेनिफिट, सरेंडर व्हॅल्यू वगैरे यामध्ये काही नाही.
हेल्पलाईन क्रमांक -
सदर योजनेसंबंधी आपल्याला कोणतीही अडचण असेल तर त्यासाठी शासनाने प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना टोल फ्री हेल्पलाइन नंबर दिले आहे यावर आपण आपली समस्या सांगून त्याबद्दल निराकरण करू शकता सदर हेल्पलाइनवर आपल्याला या योजनेत सहभागी होण्यासाठी तसेच क्लेम करण्यासाठी सर्व माहिती दिली जाईल हेल्पलाइन नंबर आहेत 18001801111 / 1800110001