एक्स्प्लोर

Mobile Recharge Rules : आता 28 नव्हे तर 30 दिवसांसाठी रिचार्ज, मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी मोठी बातमी, राघव चढ्ढांची मागणी सरकारकडून मान्य

TRAI New Recharge Rules : टेलिकॉम यूजर्ससाठी केंद्र सरकार आणि ट्राय (TRAI) कडून मोठा दिलासा मिळाला आहे. आता टेलिकॉम कंपन्यांना 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे प्लॅन्स देणे बंधनकारक असणार आहे.

नवी दिल्ली : देशभरातील लाखो मोबाईल प्रीपेड यूजर्ससाठी एक अत्यंत आनंददायी आणि मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे राघव चड्ढा यांनी संसदेत उचलून धरलेली मागणी अखेर केंद्र सरकार आणि टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाने (TRAI) मान्य केली आहे. 

नव्या नियमांनुसार आता टेलिकॉम कंपन्यांना ग्राहकांसाठी पूर्ण 30 दिवसांच्या व्हॅलिडिटीचे रिचार्ज प्लॅन्स (30 Days Recharge Plan) उपलब्ध करून देणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे यूजर्सना आता वर्षातून 13 वेळा नाही तर केवळ 12 वेळाच मोबाईल रिचार्ज करावा लागणार आहे.

TRAI New Regulations : टेलिकॉम ग्राहक संरक्षण नियमावली 2026 लागू

खासदार राघव चड्ढा यांनी या निर्णयाची माहिती देत केंद्र सरकार आणि 'ट्राय'चे आभार मानले आहेत. सरकारने 'टेलिकॉम कन्झ्युमर प्रोटेक्शन (तेरावी सुधारणा) रेग्युलेशन, 2026' लागू केले आहे. यापूर्वी टेलिकॉम कंपन्या 28 दिवसांचा महिना धरून ग्राहकांकडून वर्षातून 13 वेळा रिचार्ज करून घेत असत. मात्र, आता नव्या नियमांमुळे यूजर्सच्या पैशांची आणि वेळेची मोठी बचत होणार आहे.

Key Benefits for Users : ग्राहकांना मिळणारे मुख्य 3 मोठे फायदे

30 दिवसांचा पूर्ण रिचार्ज : आता कंपन्यांना 28 दिवसांऐवजी पूर्ण 30 दिवसांचा रिचार्ज प्लॅन द्यावाच लागेल. यामुळे वर्षातील 13 व्या महिन्याच्या अतिरिक्त रिचार्जच्या खर्चातून सुटका होईल.

केवळ 'व्हॉइस आणि एसएमएस' प्लॅन्स : ज्या ग्राहकांना इंटरनेट किंवा डेटाची गरज नाही, विशेषतः ज्येष्ठ नागरिक; त्यांच्यासाठी आता फक्त इनकमिंग आणि आउटगोइंग कॉलिंग आणि एसएमएस असणारे स्वस्त 'व्हॉइस ओन्ली' प्लॅन्स (Voice Only Plans) उपलब्ध करून दिले जातील. यूजर्सना जेवढ्या सेवेची गरज आहे, तेवढ्याच सेवेचे पैसे द्यावे लागतील. अनावश्यक डेटा प्लॅन्स खरेदी करण्याची सक्ती आता राहणार नाही.

Raghav Chadha Statement : 'रचनात्मक राजकारणाचा उत्तम नमुना'

या निर्णयावर आनंद व्यक्त करताना खासदार राघव चड्ढा म्हणाले, "अनेक नागरिकांनी रिचार्ज प्लॅन्सच्या मर्यादित पर्यायांबद्दल माझ्याकडे चिंता व्यक्त केली होती. मी 11 मार्च रोजी संसदेत हा मुद्दा उपस्थित करून स्वस्त आणि अधिक पर्यायांची मागणी केली होती."

ते पुढे म्हणाले, "जनतेची ही रास्त मागणी सरकारने मानली आहे. जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी संसदेत जनतेचा आवाज बनतो आणि सरकार तो मान्य करते, तेव्हा तो रचनात्मक राजकारणाचा (Constructive Politics) उत्तम नमुना ठरतो."

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा नवीन नियम माहित आहे का? आता बँक खाते नसतानाही तुम्ही पैसे मिळवू शकता, जाणून घ्या सविस्तर माहिती 
EPFO EPS Pension : ईपीएफओच्या पेन्शनधारकांना दिलासा? पेन्शन 1000 रुपयांवरुन 3000 रुपये होणार असल्याच्या चर्चा, CBT ची बैठक कधी?
ईपीएस पेन्शनधारकांना दिलासा मिळणार? किमान मासिक पेन्शन 3000 रुपये होणार असल्याच्या चर्चा, CBT ची बैठक कधी?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
मदर डेअरीनंतर अमूलचाही मोठा निर्णय, दुधाच्या दरात केली मोठी वाढ, नवीन दर काय?
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar call : आमच्या गावचा रस्ता कधी करता ? खासदार ओमराजेंना चिमुकल्याचा थेट सवाल
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil:Satej Patil यांच्यावरील टीकेला उत्तर,चंद्रकांत पाटलांवर टीका
Majha Katta Mrudula Dadhe EP 1 : अजरामर गाण्यांमागच्या अफलातून गोष्टी, मृदुला दाढेंसोबत शब्दसुरांची मैफल
Satej Patil PC : धमक्या कुणाला देताय? मी सुद्धा पाटील, ३-३ मंत्र्यांना उत्तर UNCUT PC
Hasan Mushrif speech Gokul : ... ती बंटी पाटलांची शेवटची सभासमजा, 13 संचालकांना इशारा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Educational Institute: सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
सिंहगड शिक्षण संस्थेला हायकोर्टाचा मोठा दणका; 44 संस्थांची CBI, ED, आयकर विभागाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय आहे प्रकरण?
Pune Crime News: पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
पुण्यात फटाक्यांच्या वादातून रक्तरंजित थरार; वडिलांना वाचवण्यासाठी धावलेल्या 21 वर्षीय तरुणीच्या डोक्यात वर्मी वार बसला अन्..., नेमकं काय घडलं?
NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत वेगवान घडामोडी, पण काहीच कळेना; काँग्रेस नेत्याच्या वक्तव्याने वेगळाच ट्विस्ट, नेमकं काय म्हणाला?
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्रात सायबर फसवणुकीचा मोठा विळखा; ८ महिन्यांत २,११९ कोटींचा गंडा
Diwali Fire Incidents Mumbai: मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
मुंबईत अग्नीतांडव सुरुच! 5 दिवसांत 333 आगींच्या घटना, फटाक्यांवरील बंदी फक्त कागदावरच?
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर, मुद्रा योजनेसाठी 5000 कोटींना मंजुरी
केंद्र सरकारचा मोठा निर्णय, रब्बी हंगामातील खतांसाठी 62370 कोटींचं अनुदान मंजूर
Mumbai Crime: मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
मालाडच्या मढ आयलंडवर धक्कादायक घटना, पार्टीत तरुणीला गुंगीचे औषध देऊन नको ते केलं, 22 वर्षांच्या विद्यार्थ्याला अटक
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
अर्शदीपची समरीनकडून विकेट; टीम इंडियाच्या गोलंदाजाचा फिल्मीस्टाईल प्रपोज, साखरपुड्यानंतर नवी इनिंग
Embed widget