एक्स्प्लोर

Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी

Mhada Pune Lottery : म्हाडाच्या पुणे मंडळानं  4462 घरांसाठी अर्ज सादर करण्यास मुदतवाढ दिली आहे. अर्जदारांना काही तांत्रिक समस्यांचा सामना करावा लागत होता, त्यामुळं मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबई: म्हाडाच्या पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत 4462 सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी दि. 22 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. सोडतीसाठी आतापर्यंत 1,67,570 अर्ज प्राप्त झाले असून अनामत रकमेसह 104086 अर्ज प्राप्त झाले आहेत.  

सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याची प्रक्रिया दि. 24 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12 वाजेपासून सुरू झाली. सोडतीमध्ये 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी पुणे येथील मांजरी खुर्द , म्हाळुंगे, भूगाव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महानगरपालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबडेवाडी, मुंढवा, ऊंड्री, वडगाव, बावधन, कोंढवा खुर्द येथे सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, वाकड, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव येथील सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.   

अर्जदारांनी IHLMS 2.0 या प्रणालीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अपलोड केलेले डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला MahaIT कडून तसेच आयकर विवरण हे आयकर विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने पडताळणी करण्यात येते. परंतु, त्या प्रक्रियेस काही वेळ लागत असल्यामुळे अर्जदारांच्या विनंतीचा विचार करून ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी अर्जदारांना दिनांक 15 ऑक्टोबर 2026 रात्री 11:59 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु MahaIT कडून डोमिसाईल प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला पडताळणी होण्यात अडचणी येत आहेत. अद्यापपर्यंत एकूण 3872 डोमिसाईल प्रमाणपत्र व 9142 उत्पन्नाचे दाखले पडताळणीसाठी प्रलंबित आहेत. वरील बाबींचा विचार करून अर्जदारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी सदर मुदतवाढ देण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RBI : भारतामधील 'या' 3 बँका बुडाल्यास देशाच्या अर्थव्यवस्था संकटात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नावं सांगितली...
भारतामधील 'या' 3 बँका बुडाल्यास देशाच्या अर्थव्यवस्था संकटात, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नावं सांगितली...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
Multibagger Stock : 2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, 1 लाखांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश
2 रुपयांचा मल्टीबॅगर स्टॉक 360 रुपयांवर पोहोचला, तब्बल 17000 टक्के रिटर्न, गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
Sensex Nifty Stock Market : सोने चांदीच्या दरात पुन्हा तेजी, दुसरीकडे सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे 6 लाख कोटी बुडाले, ट्रम्प कनेक्शन समोर
सेन्सेक्स-निफ्टीत घसरण, शेअर बाजारात पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचं नुकसान, 6 लाख कोटी बुडाले
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Rohit Pawar Morcha : पक्ष माधारी? एकट्याचीच 'तुतारी' ट्रॅक्टर मोर्चाची हाक Special Report
Solapur Drought: 300 फूट खोली, 4 हजार मोटर्सचे सापासारखे पसरलेले पाईप्स, सोलापूरमधील दुष्काळाचं काळीज हादरवणारं दृश्य
Solapur Madha Well Drought : पाण्यासाठी ३०० फूट खोल बोगद्यात संघर्ष, भीमा-सीना बोगद्याचे भयावह वास्त
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satej Patil on Gokul case: राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
राज्यात भीषण दुष्काळ अन् सरकारने गोकुळची लढाई जिंकण्यासाठी वकिलाला 80 लाख रुपये मोजले, सतेज पाटलांचा संताप
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Maharashtra Live blog updates: बार्शी तालुक्यातील कारी गावात गेल्या दीड महिन्यात तब्बल 600 बोअरवेल खोदल्या, द्राक्षबागा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड
Mumbai Book Festival : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, 200 प्रकाशकांसह 600 हून अधिक स्टॉलचा समावेश, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई पुस्तक महोत्सव 2026 चे उद्घाटन, मुंबई विद्यापीठाच्या परिसरात आयोजन
Gold Silver Price Update: अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
अखेर 10 दिवसानंतर सोने आणि चांदीच्या दरातील घसरणीला ब्रेक, सोनं 1500 रुपयांनी महागलं...
Jensen Huang : अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला, जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक, कंपनीनं अध्यक्षपदासह CEO ची जबाबदारी सोपवली
अखेर एनवीडियानं निर्णय फिरवला,जेनसेन हुआंग यांचं थाटात कमबॅक
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
पक्षांतरबंदी कायद्यात व्यापक सुधारणा करण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात याचिका, निवडणूक आयोगाला नोटीस
WTC Final: न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
न्यूझीलंड विरोधातील पहिली कसोटी ड्रॉ, टीम इंडिया WTC फायनलमध्ये कशी पोहोचणार? जाणून घ्या समीकरण
Anjali Ambedkar: Anjali Ambedkar: शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
शरद पवार, सुप्रिया सुळे भाजपच्या विभाजनवादी राजकीय अजेंड्याला पुढे नेतात, मग त्यांना भाजपची बी-टीम का म्हटलं जात नाही: अंजली आंबेडकर
Embed widget