एक्स्प्लोर

Mhada : म्हाडाकडून नाशिकमधील 402 घरांसाठी लॉटरी, 14 ते 36 लाखांच्या घरांची सोडत, जाणून घ्या सविस्तर माहिती

Mhada : म्हाडा नाशिक मंडळातर्फे आगाऊ अंशदान तत्वावर 402 सदनिका विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला 'म्हाडा'चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला.

मुंबई : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे नाशिक शहरातील चुंचाळे, पाथर्डी, मखमलाबाद, आडगाव, सातपूर शिवारात असलेल्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील 402 निवासी सदनिका आगाऊ अंशदान (Advance Contribution) तत्वावर विक्रीसाठी आयोजित सोडतीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज स्वीकृतीला आज गो लाईव्ह कार्यक्रमाअंतर्गत 'म्हाडा'चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. 
         
वांद्रे पूर्व येथील मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमावेळी  संजीव जयस्वाल म्हणाले की, सन 2025 मध्ये नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने या सोडतीपूर्वी तीन सदनिका सोडतींद्वारे 846 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. सन 2025 मध्ये म्हाडा नाशिक मंडळातर्फे आयोजित ही चौथी सदनिका सोडत असून अधिकाधिक परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याचा मंडळाचा प्रयत्न कौतुकास्पद आहे. सदर योजनेतील सदनिकांच्या विक्री किंमतीचा भरणा सोडतीत विजेत्या ठरलेल्या यशस्वी अर्जदारांनी 5 टप्प्यांमध्ये करायचा आहे.          
       
नाशिक मंडळाने जाहीर केलेल्या सदर सोडतीत अल्प उत्पन्न गटासाठी चुंचाळे शिवारात 138 सदनिका, पाथर्डी शिवारात 30, मखमलाबाद शिवारात 48 सदनिका, आडगाव शिवारातील 77 अशा एकूण 293 सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी सातपूर शिवारात 40 सदनिका, पाथर्डी शिवारात 35, आडगाव शिवारात 34 अशा एकूण 109 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रु. 14,94,023/- ते रु. 36,75,023/- दरम्यान या सदनिकांच्या किंमती आहेत.
 
इच्छुक अर्जदारांनी https://housing.mhada.gov.in किंवा https://mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. दि. 23 डिसेंबर,2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्याची मुदत आहे. दि. 23 डिसेंबर, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. दि. 24 डिसेंबर, 2025 रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस, एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरता येणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी दुपारी 03.00 वाजता सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. 30 डिसेंबर, 2025 रोजी सायंकाळी 06.00 वाजेपासून ते दि. 02 जानेवारी, 2026 रोजी सायंकाळी 06. 00 वाजेपर्यंत प्रारूप यादी प्रसिद्धीनंतर ऑनलाइन आक्षेप/ दावे-हरकती दाखल करता येणार आहे. 

दि. 06 जानेवारी, 2026 रोजी सायंकाळी 06.00 वाजता दावे-हरकती निकाली काढल्यानंतर अंतिम यादीची प्रसिद्धी केली जाणार आहे. सोडतीचा दिनांक, वेळ व स्थळ संकेतस्थळावर स्वतंत्रपणे प्रसिद्ध केला जाणार आहे.    
       
सोडतीसाठी अर्ज करताना अर्जदारास दि. 01 एप्रिल 2024 ते दि. 31 मार्च 2025 या कालावधीतील उत्पन्नाचा पुरावा सादर करणे आवश्यक आहे. अर्जदाराचे आयकर विवरणपत्र अथवा तहसील कार्यालयाचे उत्पन्न प्रमाणपत्र यातील एक उत्पन्न पुरावा ग्राह्य धरला जाईल.

सोडतीत समावेश असलेल्या योजनांची सविस्तर माहिती, पात्रता निकष, आरक्षण, अर्ज करण्याची कार्यपद्धती, अटी व शर्ती इत्यादी बाबी नमूद असलेली माहिती पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडतीकरिता अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराने संकेतस्थळावरील व माहिती पुस्तिकेतील सर्व अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा, असे आवाहन नाशिक मंडळातर्फे करण्यात आले आहे.

यावेळी नाशिक मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदीरकर आदींसह अधिकारी उपस्थित होते.

युवराज जाधव एबीपी माझाच्या डिजीटल टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत आहेत. डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांच्याकडे ८ वर्षांचा अनुभव आहे. एबीपी माझासोबत ते मार्च 2024 पासून कार्यरत आहेत. आपल्या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये महाराष्ट्र टाइम्स, टीव्ही ९ मराठी, ईटीव्ही भारत या नामांकित संस्थांचा समावेश आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन आणि पत्रकारिता विभागातून (रानडे इन्स्टिट्यूट) मधून त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी डिजीटल पत्रकारिता क्षेत्रात कामाला सुरुवात केली. युवराज जाधव सातारा जिल्ह्यातील असून स्थानिक स्वराज संस्थाचं राजकारण ते राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील घडामोडींबाबत लेखन करतात. याशिवाय,आंतराराष्ट्रीय घडामोडी, शिक्षण, क्रीडा क्षेत्रातील घडामोडींसह ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांवर काम करतात.

 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Rate : सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, वर्षभरातील निचांकी पातळीपर्यंत सोनं घसरलं, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याच्या दरात 2015 नंतर सर्वात मोठी घसरण, सोन्याचे दर कोसळण्याची प्रमुख 5 कारणं...
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
सोन्याचे दर घसरणार की वाढणार? काय आहे नेमकी स्थिती? जाणून घ्या माहिती
MS Dhoni Business Empire : क्रिकेटनंतर व्यवसायातही 'कॅप्टन कूल'चा धमाका! कोणताही गाजावाजा न करता धोनीने उभारले तब्बल 1,000 कोटींचे साम्राज्य; काय आहे बिझनेस सिक्रेट?
क्रिकेटनंतर व्यवसायातही 'कॅप्टन कूल'चा धमाका! कोणताही गाजावाजा न करता धोनीने उभारले तब्बल 1,000 कोटींचे साम्राज्य; काय आहे बिझनेस सिक्रेट?
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Diva Tukaram Mundhe House Robbery : दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
दिव्यात तुकाराम मुंडेंच्या घरावर दरोडा, सर्वांना वाटलं FDA आयुक्तांच्याच घरी चोरी, नाम साधर्म्यामुळे उलटसुलट चर्चा
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
भिवंडीत गादीच्या कारखान्याला भीषण आग; संपूर्ण कारखाना आगीच्या भक्ष्यस्थानी, लाखोंचे नुकसान
RBI Big Action NBFC : रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
रिझर्व्ह बँकेचा मोठा दणका! एका झटक्यात तब्बल 63 फायनान्स कंपन्यांचे परवाने रद्द; तुमचे पैसे तर अडकले नाहीत ना? पाहा कंपन्यांची यादी
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव म्हणत तरुणीला अडवलं, चाकुने वार; दोन दिवसांपासून फरार तरुणाच्या मुसक्या आवळल्या
Suryakumar Yadav : 'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
'टीम सिलेक्टर जिथे बसलाय, तिथेच सिक्स मारायचे', धोनीच्या चित्रपटाची प्रेरणा अन् 82 धावांची वादळी खेळी, टीम इंडियामध्ये कमबॅकसाठी सूर्याची स्ट्रॅटेजी
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
आजीबाईला मोबाईलचा नाद, रील्सच्या आहारी गेल्यानंतर 15 दिवस रुग्णालयात; एकटेपणामुळे विरंगुळाच बनलं व्यसन
Embed widget