मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने मुंबई महामंडळासाठी एकूण 2030 घरांची सोडत जाहीर केली आहे. या सोडतीत भाग घेण्यासाठीच मुदत आता जवळजवळ संपतच आली आहे. तुम्हाला या सोडत प्रक्रियेत सहभाग घ्यायचा असेल त्यासाठी नावनोंदणी करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. म्हणजेच म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. त्यानंतर म्हाडा कोणताही अर्ज स्वीकारणार नाही.
म्हाडाचा नियम काय आहे, मुदत नेमकी किती?
म्हाडाच्या अधिसूचनेनुसार म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी 19 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. विशेष म्हणजे 19 सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवस अर्ज करता येणार नाही. तुम्हाला या सोडत प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी 19 सप्टेंबर रोजी 11.59 वाजण्यापूर्वी अर्जाची नोंदणी करावी लागेल. आज दुपारी 12 वाजल्यानंतर एकाही अर्जाची नोंदणी केली जाणार नाही. अर्जाची नोंदणी केल्यानंतर तुम्हाला अनामत रक्कमही जमा करावी लागेल.
अर्जनोंदणीसाठी वाढवली होती मुदत
म्हाडाने ऑगस्ट महिन्यात 2030 घरांसाठी सोडत प्रक्रिया जाहीर केली होती. या प्रक्रियेनुसार सुरुवातील 9 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालवधीत अर्ज करता येणार होते. मात्र अर्ज करण्यासाठी फार कमी कालावधी देण्यात आल्याची तक्रार येत असल्यामुळे तसेच म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने म्हाडाने अर्ज नोंदणीची मुदत वाढवली होती. वाढवलेल्या मुदतीनुसार म्हाडाच्या सोडतीत भाग घेण्यासाठी 19 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार होता. 11.59 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज करता येईल. त्यानंतर अनामत रक्कम भरण्यासाठी अर्जदाराला पुढे 12 तासांचा कालावधी दिला जाईल.
घर मिळालं की नाही? हे कधी समजणार?
अर्जाची नोंदणी करण्याची शेवटची तारीख- 19 सप्टेंबर
कागदपत्रांची पडताळणी- 27 सप्टेंबरपर्यंत होणार
27 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता अर्जदारांच्या नावांची यादी होणार
29 सप्टेंबरपर्यंत आक्षेप नोंदवता येणार
3 ऑक्टोबर रोजी म्हाडा पात्र अर्जदारांची यादी जाहीर करणार
8 ऑक्टोबर रोजी सोडत काढली जाईल. याच दिवशी कोणाला किती जागा मिळाल्या हे समजणार
हेही वाचा :