एक्स्प्लोर

AI मुळे नोकऱ्यांवर गदा, 'या' जायंट कंपनीकडून 16 हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी

Meta Layoffs : फेसबुक-इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा AI वर भर देत मोठ्या प्रमाणावर 16 हजार कर्मचाऱ्यांना कमी करण्याच्या तयारीत असून 20 मेपासून प्रक्रिया सुरू होणार आहे.

नवी दिल्ली : जगभरातील टेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence AI) मुळे नोकऱ्यांवर संकट वाढत असताना मोठी बातमी समोर आली आहे. फेसबुक आणि इंस्टाग्रामची पॅरेंट कंपनी मेटा (Meta) आता सुमारे 16 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

कंपनीचे प्रमुख मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी एआयवर पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतल्यामुळे ही मोठी कपात केली जाणार आहे. 20 मेपासून कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू होणार असून पहिल्याच टप्प्यात हजारो कर्मचाऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Meta Layoffs 2026 : 20 मेपासून छंटनीला सुरुवात

मिळालेल्या माहितीनुसार, 20 मेपासून सुरू होणाऱ्या पहिल्या टप्प्यात सुमारे 8 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागू शकते. हा टप्पा कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांच्या जवळपास 10 टक्के स्टाफवर परिणाम करणारा ठरेल.

AI Impact Jobs : एआयमुळे वाढलेले संकट

कंपनीमध्ये ज्या कामांवर एआय सहज काम करू शकते, त्या विभागांतील कर्मचाऱ्यांवर सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे. टेक इंडस्ट्रीमध्ये एआयचा वाढता प्रभाव पाहता कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

AI Investment Plan : एआयसाठी मोठी गुंतवणूक

मार्क झुकरबर्ग मेटाला एआय क्षेत्रात अग्रस्थानी आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यासाठी कंपनी जवळपास 135 बिलियन डॉलरची मोठी गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहे. या निधीचा मोठा भाग डेटा सेंटर, प्रगत चिप्स आणि एआय सॉफ्टवेअर विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

Previous Layoffs : यापूर्वीही मोठी कपात

मेटाने यापूर्वी 2022 आणि 2023 मध्येही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. त्या वेळी सुमारे 21 हजार कर्मचाऱ्यांना कंपनीने बाहेरचा रस्ता दाखवला होता. कंपनी आता अधिक ‘स्लिम’ आणि एआय-केंद्रित संरचना तयार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

Tech Industry Crisis : संपूर्ण टेक क्षेत्रात नोकऱ्यांवर संकट

ही समस्या केवळ मेटापुरती मर्यादित नसून संपूर्ण टेक इंडस्ट्रीमध्ये कंपन्या कर्मचारी संख्या कमी करून एआयमध्ये गुंतवणूक वाढवत आहेत. विविध अहवालांनुसार, यावर्षी आतापर्यंत 95 पेक्षा अधिक कंपन्यांनी मिळून 73 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे.

ही बातमी वाचा :

महत्त्वाच्या बातम्या

Vimal Pan Masala Owner Net Worth: FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
FDA ची शाहरुख, अजय, टायगरला नोटीस; कोण आहेत विमल पान मसालाचे मालक?; कोट्यवधींचे साम्राज्य, चक्रावून टाकणारी संपत्ती!
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
एका दिवसात किती रेल्वे गाड्या चालवल्या जातात? किती होते कमाई आणि किती होतो खर्च? जाणून घ्या सविस्तर माहिती
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
वर्षभरात तुम्ही बँक खात्यात किती पैसे भरु शकता? काय सांगतो बँकेचा नियम? जाणून घ्या सविस्तर माहिती 
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा
रस्ते दुरुस्ती, घनकचरा ते पाणीपुरवठा, चाकण MIDC बाबत मंत्री उदय सामंतांचे मोठे निर्णय, कंत्राटदारांनाही दिला इशारा

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
श्रीलंकेच्या डावाची धक्कादायक सुरुवात! पहिल्याच षटकात पहिला गडी गारद, टीम इंडिया 462 वर ऑलआऊट, जाणून घ्या Live अपडेट्स
Manohar Mama Bhosale Case: भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
भोंदूबाबा मनोहर भोसले प्रकरणाला नवे वळण; दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांच्यासह तिघं सहआरोपी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Ind vs Sl 1st Test Day-3 Weather Forecast Galle : भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
भारत-श्रीलंका कसोटीवर मोठं संकट; तिसऱ्या दिवशी हवामानाचा नेमका अंदाज काय? गॉलमधून धक्कादायक अपडेट
Embed widget