Bank Holidays in May 2022 : एप्रिल महिना संपून लवकरच मे महिना सुरु होणार आहे. अशा वेळी, तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर आताच उरकून घ्या. कारण मे महिन्यात सलग अकरा दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार मे महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.
मे 2022 मधील बँक सुट्ट्यांची यादी :
1 मे (रविवार) - महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी.
2 मे (सोमवार) - रमजान-ईद (ईद-UI-फित्रा). केरळमधील कोची, तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील.
3 मे (मंगळवार) - भगवान श्री परशुराम जयंती/रमजान-ईद /बसव जयंती/अक्षय तृतीया. कोची आणि तिरुवनंतपुरम वगळता संपूर्ण भारतात बँका बंद राहतील.
8 मे (रविवार) - सार्वजनिक सुट्टी.
9 मे (सोमवार) - रवींद्रनाथ टागोर यांची जयंती. पश्चिम बंगालमध्ये बँकांना सुट्टी.
14 मे (शनिवार) - सार्वजनिक सुट्टी.
15 मे (रविवार) - सार्वजनिक सुट्टी.
16 मे (सोमवार) - बुद्ध पौर्णिमा. त्रिपुरा, बेलापूर, मध्य प्रदेश, पंजाब आणि हरियाणा, उत्तराखंड, जम्मू, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, नवी दिल्ली छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहतील.
22 मे (रविवार) - सार्वजनिक सुट्टी.
28 मे (शनिवार) - सार्वजनिक सुट्टी.
29 मे (रविवार) - सार्वजनिक सुट्टी.
या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात.
महत्वाच्या बातम्या :