Nashik Bhonga News Updates : नाशिकचे माजी पोलिस आयुक्त दिपक पांडेय (Deepak Pandey) यांचा भोंग्याबाबतचा मनाई आदेश नवे पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे (Jayant Naiknavare) यांनी केला रद्द आहे. भोंग्याबाबत शहरातील (Nashik Bhonga Issue) सर्व परिस्थिती विचारात घेता स्वतंत्र आदेशाची गरज नसल्याचं नव्या पोलिस आयुक्तांच मत आहे.  भोंग्याबाबत महाराष्ट्र शासन जो निर्णय घेईल त्याची अंमलबजावणी केली जाणार असल्याचं  पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांचं मत आहे. 17 एप्रिलला दीपक पांडेय यांनी भोंग्याबाबत मनाई आदेश जारी केला होता. 


दीपक पांडेय यांचे काय होते आदेश -


- 3 मे पर्यंत मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार होती नाहीतर 3 मे नंतर कारवाईला सामोरे जावे लागणार होते


- कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक होती


- अजानवेळी मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही







नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या या आदेशानंतर जोरदार चर्चा सुरू झाली होती. पांडे यांनी दिलेल्या आदेशात म्हटलं होतं की, मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास परवानगी नाही. त्याशिवाय, कोणाला हनुमान चालीसा लावायची असल्यास देखील पोलीस आयुक्तांची परवानगी आवश्यक असणार. नाशिकमध्ये सर्वच प्रार्थनास्थळावरील भोंग्यांना पोलिसांची परवानगी घ्यावी लागणार. 3 मे पर्यंत मशीदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांची परवानगी घ्यावी लागणार. त्यानंतर जर 3 मे नंतर प्रार्थनास्थळावर विनापरवानगी भोंगे असतील तर त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं आदेशात म्हटलं होतं.


नाशिक पोलीस आयुक्तालयाने काढलेल्या आदेशात सांगितलं होतं की, ध्वनीक्षेपकाबाबत सर्वोच्च न्यायलयाच्या आदेशाचे पालन करण्यात येणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि त्याअनुषंगाने राज्य सरकारचे आदेश यानुसार, आवाजाची पातळी ठरवण्यात आली आहे. या आवाजाची पातळी औद्योगिक, निवासी, व्यावसायिक, शांतता क्षेत्रासाठी निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार भोंगे असलेल्या प्रार्थनास्थळांना आवाजाची पातळी ठरवावी लागणार आहे, असं पांडे यांनी काढलेल्या आदेशात म्हटलं होतं.  


इतर महत्त्वाच्या बातम्या: