Global Recession : सध्या जगातील अनेक देशांवर जागतिक मंदीचं (Global Recession) संकट आहे. जपानपासून ब्रिटनपर्यंत सर्वच देश मंदीच्या गर्तेत सापडले आहेत. तर दुसरीकडे कर्जाच्या ओझ्यानं अमेरिका त्रस्त आहे. जर आपण भारताच्या शेजारी असणारा देश पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशबद्दल बोललो तर या देशांची आर्थिक परिस्थिती देखील अत्यंत वाईट आहे. अशा या मंदीच्या काळात भारताच्या विकासदरात वाढ होताना दिसत आहे. 


अनेक देश मंदीच्या गर्तेत


सध्या जगात काही मोजकेच देश आहेत जे विकासाच्या मार्गावर आहेत. त्यात भारत आघाडीवर आहे. या मंदीच्या काळातही भारतात वेगानं विकास सुरु आहे. जपानपासून ब्रिटनपर्यंत सर्वच देश मंदीच्या गर्तेत आहेत. कर्जाच्या ओझ्याने अमेरिका त्रस्त आहे. मंदीचा तडाखा बसल्यानंतर जपानने जगातील तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे स्थान गमावले आहे. म्हणजेच आता जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाला आहे. या क्रमवारीत घसरण होण्याचे कारण म्हणजे कमकुवत येन आणि देशातील वृद्धत्व आणि घटती लोकसंख्या हे आहे. जपान आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था झाली आहे. 


ब्रिटन सध्या मंदीच्या गर्तेत अडकले आहे. पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासाठी हा सर्वात कठीण काळ आहे. कारण त्यांनी 2024 मध्ये देशाची अर्थव्यवस्था वाढवण्याचे आश्वासन निवडणुकीत दिले होते. ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स (ONS) ने सांगितले की, जुलै ते सप्टेंबर दरम्यान 0.1 टक्के घसरल्यानंतर, डिसेंबर ते तीन महिन्यांत सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) अपेक्षेपेक्षा 0.3 टक्क्यांनी कमी झाले आहे. ब्रिटनची अर्थव्यवस्था जवळपास दोन वर्षांपासून स्थिर आहे. बँक ऑफ इंग्लंडने म्हटले आहे की 2024 मध्ये त्यात थोडी वाढ होण्याची अपेक्षा आहे. 


अमेरिकेवर कर्जाचा मोठा डोंगर 


यूएस सरकारच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेवर 33.91 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था 26.95 ट्रिलियन डॉलर्सची आहे. याचा अर्थ अमेरिकेचे कर्ज एकूण अर्थव्यवस्थेपेक्षा 7 ट्रिलियन डॉलर अधिक आहे. त्यामुळं जागतिक अर्थव्यवस्थेत खळबळ उडाली होती. अमेरिकेच्या संसदेतील कर्ज मर्यादेचे हे संकट टाळण्याचे काम केले. मात्र, येत्या काही महिन्यांत अमेरिकेला पुन्हा कर्ज मर्यादेच्या संकटाचा सामना करावा लागू शकतो. अमेरिकेकडे असलेल्या कर्जाच्या रकमेतून 10 ब्रिक्स देश आणि जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानसारखे देश तयार होऊ शकतात. म्हणजे जगातील 11 मोठ्या देशांच्या तुलनेत नवे देश निर्माण केले जाऊ शकतात. दुसरीकडे, युरोपियन युनियनमधील 48 देशांचा जीडीपी जरी एकत्र केला तरी तो अमेरिकेच्या एकूण कर्जापर्यंत पोहोचू शकत नाही. या देशांचा एकूण जीडीपी सुमारे 27 ट्रिलियन डॉलर आहे. म्हणजे जगातील असे 50 देश नव्याने निर्माण करता येतील.


भारत विकासाच्या मार्गावर?


2024 मध्ये भारत जगाला आपली ताकद दाखवेल असे बोलले जात आहे. सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) देशाच्या GDP वाढीचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार देशाचा विकास दर इतका जबरदस्त असेल की अर्थव्यवस्थेत भरपूर पैसा वाहून जाईल. एनएसओच्या आकडेवारीनुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात देशाची वास्तविक जीडीपी वाढ 7.3 टक्के असेल. हे 2022-23 मधील 7.2 टक्क्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. एनएसओने पहिल्यांदाच देशाच्या जीडीपीबाबत असा अंदाज जारी केला आहे.


भारत आज जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 


भारत आज जगातील 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारत या स्थानावर पोहोचला आहे. 2027 पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची अपेक्षा आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळं देशात थेट परकीय गुंतवणूक (FDI) वाढली आहे. गेल्या 9 वर्षांत ते 615.73 अब्ज डॉलर्स झाले आहे. भारताच्या परकीय चलनाच्या साठ्यातही झपाट्याने वाढ झाली आहे. आज तो 620.44 अब्ज डॉलरच्या पातळीवर पोहोचला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मोठी बातमी! जपानला मागे टाकत जर्मनी जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था