मुंबई : क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा क्रिकेट जगतात सर्वाधिक प्रसिद्ध चेहऱ्यांपैकी एक आहे. त्याला प्रचंड चाहतावर्ग आहे. क्रिकेटमध्ये जसा तो धडाकेबाज खेळी खेळताना दिसतो. अगदी तशाच पद्धतीने तो आर्थिक क्षेत्राचं नियोजनही करताना दिसतो. त्याने नुकतंच एका इलेक्ट्रिक सायकल तयार करणाऱ्या ई-मोटोरॅड (Emotorad) नावाच्या कंपनीत पैसे गुंतवले आहेत. विशेष म्हणजे ही कंपनी महाराष्ट्रातील असून आता तिने आपले काम वेगात चालू केले आहे. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात ही कंपनी आपला प्लान्ट तयार करत आहेत.
प्लॅन्ट 15 ऑगस्टपासून चालू होणार
धोनीने पैसे गुंतवलेल्या कंपनीचे नाव ई-मोटोरॅड आहे. या कंपनीते धोनीने पैसे गुंतवले आहेत. मात्र ते नक्की किती आहेत, याची कोणतीही ठोस माहिती धोनी किंवा कंपनीनेही दिलेली नाही. गेल्या महिन्यात धोनीने ही गुंतवणूक केलीहोती. या गुंतवणुकीनंतर ई-मोटोरॅड या कंपनीने आपल्या कामाला जोमात सुरुवात केली आहे. पुण्यातील रावेत येथे ही कंपनी आपला मॅन्यूफॅक्चरिंग प्लान्ट तयार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा प्लॅन्ट तब्बल 2 लाख 40 हजार स्केअरफुटावर पसरलेला आहे. येत्या 15 ऑगस्टपासून या हा प्लान्ट प्रत्यक्ष चालू होणार आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार या प्लॅन्टची तब्बल 5 लाख इकेक्ट्रिक सायकल तयार करण्याची क्षमता आहे. त्यासाठी कंपनीकडून अतिरिक्त कर्मचाऱ्यांची भरती केली जात आहे. सध्या या कंपनीकडे 250 कर्मचारी आहेत. ही कंपनी आता आणखी 300 नव्या कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचा विचार करत आहे.
असा असेल पुण्यातील प्लॅन्ट
ई-मोटोरॅड कंपनीच्या म्हणण्यानुसार पुण्याजवळ तया होत असलेल्या या प्लॅन्टचे काम एकूण चार टप्प्यांत केले जाणार आहे. या प्लॅन्टचा विस्तार पाहूनच त्याल गिगाप्लॅन्ट म्हटले जात आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हा प्लॅन्ट उभारून पूर्ण झाल्यानंतर तो दक्षिण आशियातील सर्वांत मोठा तसेच संपूर्ण जगातील दुसऱ्या क्रमांकाची इंटिग्रेटेड ई-सायकल सुविधा देणार आहे.
कंपनी नेमकं कशाचं उत्पादन घेणार?
दरम्यान, धोनीने गुंतवलेल्या या कंपनीतर्फे ई-सायकलसाठी वापरल्या जाणाऱ्या सुट्या भागांची निर्मिती करणार आहे. यामध्ये बॅटरी, मोटार, डिस्प्ले, चार्जर आदी वस्तूदेखील ही कंपनी स्वत:च तयार करणार आहे. आगामी काळात ही कंपनी नवनव्या इलेक्ट्रिक सायकलींसह अन्य नवे इलेक्ट्रिक अपकरणंदेखील बाजारात आणणार आहे.
(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)
हेही वाचा :
'या' कंपनीत पैसे गुंतवा अन् व्हा मालामाल, एका महिन्यात दिलेत तब्बल 582 टक्क्यांनी रिटर्न्स
नावाला पेनी स्टॉक, पण शेअर बाजारावर सुस्साट, 'या' दहा कंपन्यांत छप्परफाड कमाई!
शेअर बाजारावर 'हा' शेअर सुस्साट! एका वर्षात दुप्पट रिटर्न्स; खरेदी करण्यासाठी झुंबड!