मुंबई : मंगळवारी मुंबई शेअर बाजार निर्देशांक अर्थात सेन्सेक्स (BSE) 384 अंकांनी घसरून  73512 अंकांवर स्थिरावला. तर  राष्ट्रीय शेअर बाजार निर्देशांक (NSE) अर्थात निफ्टी 140 अंकांच्या घसरणीसह 22302 अंकांवर स्थिरावला. सध्या देशभरात तुलनेने कमी मतदान होत आहे. त्याचाच परिमाम भारतीय शेअर बाजारावर पाहायला मिळथोय. गेल्या तीन दिवसांपासासून शेअर बाजारात (Share Market) गुंतवणूकदारांचे एकूण 11 लाख कोटी रुपये बुडाले आहेत. बुधवारीदेखील शेअर बाजारात काय घडामोडी घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, तुम्ही बुधवारी (8 मे) पेनी स्टॉक्सच्या (Penny Stocks) माध्यमातून पैसे कमवू इच्छित आहात तर जाणून घेऊया असे दहा शेअर जे तुम्हाला चांगला परतावा देऊ शकतात. मंगळवारी शेअर बाजाराची स्थिती फारशी चांगली नव्हती. मात्र तरीदेखील या दहा पेनी स्टॉक्समध्ये चांगली तेजी नोंदवली गेली होती. 


बुधवारी या 10 पेनी स्टॉक्सवर ठेवा नजर


Savani Financials Ltd या कंपनीच्या शेअरचा भाव मंगळवारी 4.97 रुपयांपर्यंत पोहोचला होता. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये 40 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. 


Gayatri BioOrganics Ltd या कंपनीचा मंगळवारचा भाव 5.9  रुपये होता. या शेअरमध्ये मंगळवारी 9.87 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली. 


Scintilla Commercial & Credit Ltd ही कंपनीदेखील चांगली कामगिरी करत आहे. मंगळवारी या कंपनीच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. सध्या या कंपनीचा शेअर 4.62 रुपयांवर आहे.


Oscar Global Ltd कंपनीचा शेअर मंगळवारी 9.67 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये मंगळवारी 4.99 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. 


Franklin Industries Ltd शेअरचे मूल्य मंगळवारी 6.76 रुपये होते. मंगळवारी या कंपनीचा शेअर 4.97 टक्क्यांनी वाढला होता. 


NB Footwear Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी 7.61 रुपयांवर पोहोचला. या शेअरमध्ये 4.97 टक्क्यांची तेजी नोंदवली गेली. 


iStreet Network Ltd या कंपनीच्या शेअरने 2.55 रुपयांपर्यंत मजल मारली. ही वाढ 4.94 टक्के होती. 


RCI Industries & Technologies Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी 4.26 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला. मंगळवारची ही वाढ 4.93 टक्के होती. 


Purple Entertainment Ltd या कंपनीचा शेअर मंगळवारी 7.03 रुपये होता. या शेअरमध्ये मंगळवारी 4.93 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली.


 


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. आम्ही या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा या लेखामागचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)


हेही वाचा :


24 कॅरेट की 22 कॅरेट? नेमकं कोणतं सोनं सर्वांत चांगलं? दागिने नेमके कशाचे करावेत?


NPS योजना आहे तरी काय? या योजनेचे 'हे' खास फायदे माहिती आहेत का?


शेअर बाजारावर 'हा' शेअर सुस्साट! एका वर्षात दुप्पट रिटर्न्स; खरेदी करण्यासाठी झुंबड!