Maharashtra Budget Session Live Updates : आज विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत; चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडणार

Budget Session 2024-2025 : आज राज्याचा अर्थसंकल्प, महिला, शेतकरी, तरुणांसाठी कोणत्या तरतुदी; जाणून घ्या एका क्लिकवर

प्रज्वल ढगे Last Updated: 29 Jun 2024 11:04 PM
Buldhana Accident : भरधाव ट्रकच्या धडकेत 40 मेंढ्या चिरडल्या, 15 मेंढ्या ठार, 25 मेंढ्या जखमी

बुलढाणा : भरधाव ट्रकच्या धडकेत 40 मेंढ्या चिरडल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर मेंढपाळांचा महामार्गावर गोंधळ पाहायला मिळाला. यामुळे मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. रस्त्याच्या कडेने जात असलेल्या मेंढ्यांच्या कळपाला भरधाव आणि अनियंत्रित ट्रकने चिरडल्याने जवळपास 40 मेंढ्याची चिरडल्या गेल्या, यात 15 मेंढ्या या घटनास्थळीस ठार झाल्या तर 25 मेंढ्या  जखमी झाल्यात. जुन्या नागपूर - मुंबई महामार्गावरील सिंदखेड राजा जवळील सावरगाव माळ गावाजवळ ही दुर्घटना घडली. यावेळी अपघात झाल्यानंतर मेंढपाळांनी ट्रकला थांबवून नुकसान भरपाईची मागणी करत गोंधळ घातला. त्यामुळे नागपूर - मुंबई  महामार्ग हा काही काळ ठप्प झाला होता. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाल्याने पोलिसांना प्राचारण करण्यात आले होते.

Kalyan Crime : अल्पवयीन मुलाने चार चाकीला दिली धडक, घटना सीटीव्हीमध्ये कैद

कल्याण : अल्पवयीन मुलाने चार चाकीला दिली धडक, घटना सीटीव्हीमध्ये कैद

मित्रांना बोलावून कारचालकाला केली माराहण गाडीची देखील केली तोडफोड

अल्पवयीन मुलाच्या वडिलांचे नाव राजाराम चौधरी 

कल्याण जवळील आटाळी परिसरातील घटना

खडकपाडा पोलिसांनी अल्पवयीन मुलासह त्याच्या वडिलांच्या विरोधात केला गुन्हा दाखल

कल्याण खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक अमरनाथ वाघमोडे यांची माहिती,

साधू महाराज देवस्थानची दिंडी पंढरपूरच्या दिशेने रवाना 

नांदेड : कंधार येथील साधू महाराज संस्थांनच्या दिंडीने शनिवारी पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केले. विठुमाऊलीचा नामघोष करीत हजारो भक्त या पालखी सोहळ्यात सहभागी झालेत. साधु महाराजांच्या दिंडीचे हे 250 वे वर्ष आहे. कंधार येथील संत साधू महाराज यांनी निझामाच्या काळात भागवत धर्माची पताका उंच केली. त्यांनीच आषाढीच्या निमित्ताने कंधार -पंढरपूर पायी वारीची परंपरा सुरू केली. आता साधू महाराजांचे आठवे वंशज एकनाथ महाराज साधू यांच्या नेतृत्वात वारी सुरू आहे. त्यांचे लहान बंधू ज्ञानेश्वर महाराज साधू बाल वयापासून वारीत सहभागी होतात.या वर्षी त्यांच्या वारीचे 50 वे वर्ष आहे. संत साधू महाराज हे दत्त उपासक होते. त्यांची संजीवन समाधी उमरखेड येथे आहे. त्यामुळे विदर्भातही त्यांचा भक्त संप्रदाय आहे. साधू महाराजाच्या पंढरपूर वारीत उमरखेड येथील भक्तही मोठ्या संख्येने सहभागी होतात.

Raigad Landslide : मुंबई-गोवा महामार्गावर दासगावजवळ ट्रॅफिक 

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावर दासगावजवळ ट्रॅफिक 

दासगाव खिंडीतील माती रस्त्यावर घसरल्यानं ट्राफिक 

अर्धा तासानंतर माती आणि रस्त्यावर आलेले दगड हटवण्यात यश

एल अँड टी कंपनीकडून काम सुरू असल्याची माहिती 

महाड कडून मुंबई दिशेकडे जाणाऱ्या दासगाव हद्दीत माती घसरल्याने ट्रॅफिक 

अंतरिम अर्थसंकल्प मांडला अजून तो मंजूर झालेले नाही, मुख्यमंत्र्यांनी थेट पटलावर ठेवला जीआर, वडेट्टीवारांनी घेतला आक्षेप

विजय वडेट्टीवार

अंतरिम अर्थसंकल्प मांडला अजून तो मंजूर झालेले नाही

बजेट मंजूर झाल्यावर तो राज्यपालांना कडे जातो, त्यानंतर योजना लागू होतात

अस असताना आज मुख्यमंत्र्यांनी थेट जीआर पटलावर ठेवला
हा सभागृहाचा हक्कभंग होतोविरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आक्षेप

हा सभागृहाचा हक्कभंग होतो की नाही विरोधी पक्षनेते यांचा सवाल

झिका व्हायरसची पुण्यात वाढ होत असल्याने शासनाने त्वरित कारवाई करावी- डॉ.नीलम गोऱ्हे

पुणे जिल्ह्यात झिका व्हायरस वाढत असल्याचे समोर आले आहे. यातच पंढरपूरला जाणारे अनेक वारकरी पुण्यात दाखल होत आहे. यादृष्टीकोनातून विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शासनास त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना मंत्री उदय सामंत यांना दिल्या आहेत. याबाबत स्थानिक प्रशासनास उचित कारवाई करण्याबाबत आदेश दिले जातील व सभागृहाला अवगत केले जाईल असे आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी सभागृहात केले आहे.

राज्यात मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना सुरु करणार, मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

ख्यमंत्री
- मुख्यमंत्री तीर्थस्थळ योजना करावी अशी सर्वांची मागणी आहे
- ⁠यात धोरण ठरवूया
- ⁠नियमावली करु त्यानंतर त्यांचे आॅनलाईन अर्ज मागवू
- ⁠ प्रत्येकाची इच्छा असते मात्र ते जावू शकत नाही
- ⁠ मुख्यमंत्री तिर्थक्षेत्र योजना सुरु करणार
- ⁠त्यानंतर ही अनेक योजना राबविणार
- ⁠विजयराव तुम्ही विरोधी पक्षनेते म्हणुन कायमच काम करत रहा

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी, आमदार प्रताप सरनाईकांची मागणी

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी चारधाम यात्रेसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करावी अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केलीय. सर्वच आमदारांची परिस्थिती राम नाईक, प्रकाश सुर्वे यांच्यासारखी नसते. त्यामुळं सरकारने गरीबांसाठी योजना आणावी असे सरनाईक म्हणाले. .

डोंबिवली आणि नागपुरात कारखाना स्फोट प्रकरण, औद्यागीक सुरक्षा अधिकाऱ्यावर कारवाई करा, विजय वडेट्टीवार यांची मागणी

विजय वडेट्टीवार
- डोंबिवली आणि नागपुरात कारखान्यात स्फोट झाला,  ⁠त्या ठिकाणी  सुरक्षा व्यवस्था नव्हती.
- ⁠या कुटुंबांना स्थलांतरीत केलं पाहिजे.
-⁠ त्यांना नोकरी दिली पाहिजे
- ⁠औद्यागीक सुरक्षा अधिकारी यांच्यावर कारवाई केली पाहिजे

पेपरफुटी प्रकरणी कोणालाही पाठिशी घातलं जाणार नाही : अजित पवार

Ajit Pawar : पेपर फुटीची चर्चा या सभागृहात झाली आहे. यांच्यासोबत आमचं सरकार असताना पुण्यात काय झाल होत हे सर्वांना माहीत आहे
- ⁠सरकरने आता कायद्याच्या संदर्भात अद्यादेश काढला असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 
- ⁠दंड ही मोठा केला आहे
- ⁠कोणाला ही पाठीशी घातलं जाणार नाही
- ⁠केंद्राची परिक्षा आहे तशी राज्याच्या पातळीवर घेता येईल का यावर चर्चा सुरु आहे
- ⁠कायदा कडक केला आहे

Maharashtra News: विरोधकाकडून आज पुन्हा विधानसभेत नागपूर अमरावती महामार्गावरील चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार

Maharashtra News: विरोधकाकडून आज पुन्हा विधानसभेत नागपूर अमरावती महामार्गावरील चामुंडी ब्लास्टचा मुद्दा मांडला जाणार.

चामुंडी एक्सप्लोझिव्ह प्रायव्हेट मिलिटेड कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेटीवार लक्षवेधित मांडणार.

सातत्याने या ठिकाणी स्फोट होत असतानाही सरकारने याप्रकरणात कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्याचा आरोप. 

मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना शासनाची आणि कंपनी व्यवस्थापनाकडून ठोस मदत मिळवून देण्याची मागणी. 

दुसरीकडे विधानपरिषदेत सतेज पाटील आणि काँग्रेस नेत्यांकडून शक्तिपीठ महामार्गाचा मुद्दा मांडला जाणार.

शक्तिपीठ महामार्गाला स्थानिकांचा विरोध असल्याने सरकारने त्या अनुषंगाने कार्यवाही आणि उपाययोजना करावी अशी लक्षवेधित मागणी.

Maharashtra Budget Session Live Updates : डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेच्या भत्त्यात भरीव वाढ, अजित पवार यांची घोषणा

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, मुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग तसेच खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना विदेशात उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी २०२४-२५ सालापासून विदेशी शिक्षणासाठी शिष्टवृत्ती योजना लागू करण्यात आलेली आहे. वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष २०२३-२४ डॉ. पंजाबराव देशमुख वसतीगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत भरीव वाढ करून दरवर्षी ३८ ते ६० हजार रुपयांपर्यंत निवास भत्ता देण्यात येत आहे, असे अजित पवार यांनी जाहीर केले.  

Maharashtra Budget Session Live Updates : २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण, ५२ हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी

राज्याच्या ग्रामीण भागात ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रातून १५ ते ४५ वयोगटातील १८९८० उमेदवार कौशल्य प्रशिक्षण घेत आहेत. संशोधनाचे काम करण्यासाठी आदिवसी संशोधन प्रशिक्षण संस्था, बार्टी, छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था-सारथी, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था-महाज्योती, महाराष्ट्र संशोधन व प्रशिक्षण प्रबोधिनी इत्यादी संस्था काम करत आहेत. या संस्थांच्या माध्यमातून २ लाख ५१ हजार ३९३ विद्यार्थ्यांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यापैकी ५२ हजार विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी प्राप्त झाल्या आहेत.   

Maharashtra Budget Session Live Updates : अजित पवार यांच्याकडून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची घोषणा, तरुणांना थेट कामावर प्रशिक्षण मिळणार

औद्योगिक आणि बिगर औद्योगिक आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी दरवर्षी दहा लाख तरुण-तरुणींना प्रत्यक्ष कामावरील प्रशिक्षण देण्यासाठी मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मी जाहीर करीत आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक प्रशिक्षणार्थीला दरमहा दहा हजार रुपयांप्रमाणे विद्यावेतन दिले जाईल. त्यासाठी दरवर्षी १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  

Maharashtra Budget Session Live Updates : शेती कृषीपंपाचे सर्व थकित वीजबील माफ, अजित पवार यांची घोषणा

- संजय गांधी निराधार योजनेला १ हजारावरुन दीड हजार रुपयांच अनुदान मिळालं
- ⁠शेती कृषीपंपाचे सर्व थकित बील माफ- अजित पवार

Maharashtra Budget Session Live Updates : ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देणार, अजित पवार यांची घोषणा

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण ३३८ जलाशयांतून गाळ काढण्याचे काम चालू आहे. लोकसहभागातून आतापर्यंत ८३ लाख ३९८१८ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दिवसा अखंडित विजपुरवठा व्हावा यासाठी कृषीवाहिन्यांचे विलगीकरण आणि सौरउर्जाकरण करण्याचा 15 हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध व्हावी यासाठी मागेल त्याला सौरउर्जा पंप या योजनेसाठी ८ लाख ५० हजार शेतकऱ्यांना सौरउर्जा पंप देण्याचे मी जाहीर करतो, असे अजित पवार म्हणाले. 

Maharashtra Budget Session Live Updates : आता शेतीमाल ठेवण्यासाठी गाव तिथे गोदान, कापूस, सोयाबीन पिकासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य- अजित पवार

राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजनेतून तीन वर्षात २ लाख  १४ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच आदी शेतकरी उपकरणं खरेदी करण्यासाठी १ हजार २३९ कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना पिकाची साठवणूक करण्यासाठी गाव तिथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्त्वा असणाऱ्या गोदामांची डागडुजी करण्यात येईल. कापूस, सोयाबीन तसेच तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी यासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन २०२४-२५ मध्ये ३४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीब व रबी हंगामातील कडधान्ये तसेच तेलबीयांच्या नाफेडमार्फत खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पान्नात मोठा वाटा आहे. गेल्या वर्षात या पिकाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीब पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व उप्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरसाठी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करत आहे, असे अजित पवार म्हणाले.    

Maharashtra Budget Session Live Updates : राज्यात जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार- अजित पवार यांची घोषणा

- कांद्या तेल बियाणे याकरता फिरता निधी देण्यात येईल
- ⁠गाईच्या दूध उत्पादकांना राहिलेले अनुदान दिले जाईल

- ⁠ही योजना पुढे चालू ठेवली जाईल 

- मत्स्य बाजार स्थापना केले जाणार

- ⁠बांबूची लागवड केली जाणार आहे 

- ⁠प्रती रोपाकरता १७५ रुपये अनुदान दिले जाणार 

- वन्यप्राणी हल्ल्यात २० लाख रुपये दिले जायचे. आता २५ लाख रुपये मिळणार 

- ⁠पशुधन हानी नुकसान भरपाईत वाढ

- ⁠अपूर्ण राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण केले जाणार

- ⁠महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्प हाती घेतला जाणार 

- सांगली येथे सौर उर्जा प्रकल्प राबवला जाणार

- ⁠गोसेखुर्द प्रकल्पातून ६५ टीएमसी पाणी वळवले जाणार 

- ⁠जल युक्त शिवार अभियान २ राबवले जाणार, असे अजित पवार म्हणाले.

Maharashtra Budget Session Live Updates : आता शेतीमाल ठेवण्यासाठी गाव तिथे गोदान, कापूस, सोयाबीन पिकासाठी पाच हजार रुपयांचे अर्थसहाय्य- अजित पवार

राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकिकरण योजनेतून तीन वर्षात २ लाख  १४ हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर तसेच आदी शेतकरी उपकरणं खरेदी करण्यासाठी १ हजार २३९ कोटी रुपयांचं अनुदान देण्यात आलं आहे. शेतकऱ्यांना पिकाची साठवणूक करण्यासाठी गाव तिथे गोदाम ही योजना राबवण्यात येणार आहे. या योजनेत पहिल्या टप्प्यात १०० नवीन गोदामांचे बांधकाम तसेच अस्तित्त्वा असणाऱ्या गोदामांची डागडुजी करण्यात येईल. कापूस, सोयाबीन तसेच तेलबियांच्या उत्पादकतेत वाढ व्हावी यासाठी विशेष कृती योजना राबवण्यात येत आहे. या योजनेसाठी सन २०२४-२५ मध्ये ३४१ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. आधारभूत किमतीनुसार खरीब व रबी हंगामातील कडधान्ये तसेच तेलबीयांच्या नाफेडमार्फत खरेदी करण्यासाठी १०० कोटी रुपयांचा फिरता निधी स्थापन करण्यात येईल. कापूस व सोयाबीन पिकाचा राज्याच्या उत्पान्नात मोठा वाटा आहे. गेल्या वर्षात या पिकाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीब पणन हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व उप्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरसाठी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा मी करत आहे, असे अजित पवार म्हणाले.    

Maharashtra Budget Session Live Updates : राज्य सरकारने शेकऱ्यांसाठी आतापर्यंत काय काय केल? अजित पवारांनी मांडली आकडेवारी!

महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या १४ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर रक्कम ५१९० कोटी रुपये अदा करण्यात आली आहे. उर्वरित रकमेचेही वाटप लवकरात लवकर करण्यात येईल. नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मराठवाडा आणि विदर्भातील १६ जिल्ह्यांसाठी ५४६९ कोटी रुपयांच्या विविध योजना यशस्वी पूर्ण करण्यात आल्या आहेत. या योजनांचा ६ हजार कोटी रुपये किमतीचा दुसरा टप्पा २१ जिल्ह्यांत राबवण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पाअंतर्घत १५६१ कोटी ६४ लाख रुपये किमतीच्या ७६७ उपप्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचा लाभ सुमारे ९ लाख शेतकऱ्यांना होणार आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील १४ विपत्तीग्रस्त जिल्ह्यातील केशरी शिधापत्रिका धारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी दरमहा रोख रक्कम अदा करण्यात येते. या अंतर्गत मे २०२४ पर्यंत ११ लाख ८५ हजार लाभार्थीना आतापर्यंत ११३ कोटी ३६ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत, अशे अजित पवार यांनी सांगितले 

Ajit Pawar Budget Session Live Update : आता शितमालाच्या पंचनाम्यासाठी राज्यभर ई-पंचनामा पद्धत, अजित पवार यांची घोषणा

खरीप हंगाम 2023 करिता राज्यातील 40 तालुक्यांत दुष्काल तर १०२१ महसूल मंडळात दुष्कालसदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. दुष्काळाचे पंचनामे जलद व्हावेत यासाठी नागपुरातीला ई-पंचनामा घेण्याची चाचणी यशस्वी झाल्याने ही पद्धत राज्यभर लागू करण्यात येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत आतापर्यंत ९२ लाख ४३ हजार शेतकरी कुटुंबांना ५ हजार ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचे अनुदान देण्यात आलेले आहे. एका रुपयात पीकविमा योजनेअंतर्गत ५९ लाख ५७ हजार शेतकऱ्यांंना ३५०४ कोटी ६६ लाख रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आलेली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्घत २६९४ शेतकरी कुटुंबांना ५२ कोटी ८२ लाख रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे.     

Ajit Pawar Budget Session Live Update : राज्य सरकार 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवणार, मुलींना 100 टक्के मोफत शिक्षण- अजित पवार

- राज्यात 10 हजार पिंक रिक्षा महिलांसाठी देण्यात येतील
- ⁠नवीन रुग्नवाहिका खरेदी केल्या जातील
- ⁠मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राबिवली जाईल
- ⁠वर्षाला एका कुटुंबाला 3 सिलिंडर मोफत दिले जातील
- ⁠बच्चत गटाच्या निधीत 15 हजारांहून 30 हजार रुपयांची वाढ केली जाईल 
- ⁠ यावर्षी 25 लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे
- ⁠ व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार

Ajit Pawar Budget Session Live Update : मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा, वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार

अजित पवार यांनी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणआर आहेत. या योजनेचा फायदा 52 लाख कुटुंबियांना होणार आहे. 

Budget Session Live Update : लेक लाडकी योजनेची अजित पवार यांच्याकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना दीड हजार रुपये मिळणार

स्त्री ही कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना सधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी-बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीन विकासासाठी या योजेअंतर्गत 21 ते 60 वर्षे वयाच्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून करण्यात येईल. 

Budget Session 2024 Live Update : अजित पवार यांच्याकडून अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात

अजित पवार अर्थसंकल्प सादर करत आहेत. हा अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी विठ्ठलाला प्रमाण केला. तसेच वारकऱ्यांच्या दिंडीसाठी आम्ही भरीव मदत दिली. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची तपासणी करू, असे अजित पवार म्हणाले.

Jitendra Awhad On Porsche Car Accident : पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले, दबाव कोणी आणला, जितेंद्र आव्हाड यांचा परखड सवाल

जितेंद्र आव्हाड यांनीदेखील पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

- देवेंद्र फडणवीस आपण स्पष्ट बोलणारे आहात

- ⁠या गुन्हा संदर्भात कोणी फोन केले होते 

- ⁠कोणी दबाव आणला, याची माहिती तुम्ही दिली पाहिजे, असे आव्हाड म्हणाले.

आव्हाड यांच्या या विचारणेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.

- स्थानिक आमदार त्या ठिकाणी गेले होते

- ⁠ त्यांनी त्यांच्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे 

- ⁠कोणीही कोणाला फोन केलेला नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

Budget Session Live Update Devendra Fadnavis : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाच्या तपासादरम्यान दोन चुका, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात माहिती

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोर्शे कार अपघात प्रकरणात सरकारची भूमिका स्पष्ट केली.

- श्रीमंत गरिबाला समान न्याय दिला पाहिजे

- ससून रुग्णालयात झालेल्या प्रकारामुळे न्यायाला दाबण्याचा प्रयत्न झाला

- माध्यमं आणि लोकांनी ओरड केली म्हणून कारवाई केली असं नाही

- दहा वाजता गुन्हा दाखल केल्याबद्दल जे झालं त्याची संपूर्ण नोंद पोलीस डायरीत आहे

- साडे आठला गुन्हा दाखल केल्यानंतर मेडिकलला पाठवणे आणि वरिष्ठांना न सांगता गुन्हा दाखल करणे या दोन चुका झाल्या

Budget Session Live Update 2024 : पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणार का, विजय वडेट्टीवार यांचा सवाल

पुणे पोर्शे कार प्रकरणातील समोर आलेल्या गोष्टी लक्षात घेता पुण्याच्या पोलीस आयुक्तांचा राजीनामा घेणार का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला. 

पोर्शे कार अपघातातील कारचा वेग प्रतितास 110 किमी, फडणवीसांची विधिमंडळात धक्कादायक माहिती!

फडणवीसांनी पोर्शे कार अपघाताची माहिती विधिमंडळात दिली. पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरला अटक करण्यात आले आहे. या सर्व बाबी रेकॉर्डवर आणण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पहिली चार्जशीट दाखल करण्यात आली आहे. पुरावे गोळा करण्यात आलेले आहेत. क्रॅश इम्पॅक्ट अॅनालिसिस करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर विधिसंघर्षग्रस्त बालकाने ब्रेक मारला होता तेव्हा त्या कारचा वेग हा 110 किमी प्रति तास हा होता. तो बालक कार अत्यंत वेगात चालवत होता, असे फडणवीस म्हणाले.

तो अगोदर बसलेल्या बारचे सीसीटीव्ही फुटेज, बील जप्त करण्यात आले. तो दुसऱ्या बारमध्ये बसला होता. तेथीलही सीसीटीव्ही फुटेज घेण्यात आले आहेत. त्याच्या वडिलांवरही कारवाई करण्यात आली आहे. मुलाला गाडी चालवायला दिली म्हणून हा मुलाच्या वडिलावर गुन्हा दाखल केलेला आहे. मुलाच्या आजोबांवरही गुन्हा दाखल केला, असेही फडणवीस यांनी सांगितले.

Budget Session 2024 Live Update : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणाचा मुद्दा विधिमंडळात गाजला, विरोधक आक्रमक

पुण्यातील पोर्शे कार अपघाताचा मुद्दा विधिमंडळात उपस्थित करण्यात आला.  उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार सुनिल प्रभू यांनी सरकारला या मुद्द्यावरून घरले. लक्ष्यवेधीच्या माध्यमातून त्यांनी सरकारला या प्रकरणाशी संबंधित प्रश्न विचारले. या लक्ष्यवेधीचे गृहमंत्री देवेंद्र फडणीस यांनी उत्तर दिले. पोलिसांनी या विधिसंगृहित बालकाला अडल्ट गृहित धरावे, अशी मागणी केलेली आहे.

Budget Session 2024 Live Update : खतावर, दुधावर सरकारने जीएसटी लावला, विजय वडेट्टीवार विधिमंडळात आक्रमक

आम्हाला निकष सांगू नका. शेतकऱ्यांना मदत करा. विरोधी बाकावरील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विरोधकांवर टीका केली. खतावर, दुधावर सरकारे जीएसटी लावला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.

विरोधकांची विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी, सरकार जनतेला गाजर देत असल्याचा आरोप

विधानभवन परिसरात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राज्य सरकार जनतेला फक्त आश्वासनं देत आहे. सरकार फक्त गाजर दाखवत आहे, असा आरोप विरोधकांनी केल आहे. यावेळी विरोधी बाकावरील आमदारांनी हातात गाजर घेऊन सराकरविरोधात घोषणाबाजी केली.  

Ajit Pawar : आज दुपारी दोन वाजता अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार

आज दुपारी दोन वाजता राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प विधिमंडळात सादर करतील.

Budget Session 2024 : विधानसभा समोर ठेवून भरीव तरतुदी करण्याची शक्यता

महायुतीचे घटकपक्ष भाजप, राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट) यांना लोकसभेच्या निवडणुकीत चांगलाच फटका बसला. तरुण, महिला तसेच मुस्लीम, दलित वर्गाने महायुतीच्या उमेदवारांना मतं दिली नाहीत. परिणामी अनेक जागांवर महायुतीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. हीच पुनरावृत्ती विधानसभेच्या निवडणुकीतही होऊ नये यासाठी महायुती यावेळी सावध भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यासाठी राज्य सरकार राज्यातील वेगवेगळ्या घटकांसाठी भरीव तरतुदी करण्याची शक्यता आहे.    

Budget Session 2024 : राज्य सरकारतर्फे बेरोजगार तरुणांना दिला जाणार भत्ता?

राज्य सरकार यावेळी तरुणांसाठीही मोठी तरतूद करण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार सरकार बेरोजगार तरुणांसाठी प्रतिमहिना 5 हजार रुपयांचा भत्ता देण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

Mukhyamantri Ladli Behna Scheme : महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची होणार घोषणा?

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता राज्य सरकार यावेळी महिलांसाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता आहे. राज्य यावेळी महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत सरकार आर्थिक दुर्बल महिलांना प्रतिमहिना 1200 ते 1500 रुपये देण्याची शक्यता आहे.

Budget Session 2024 : आज राज्याचा अर्थसंकल्प, कोणकोणत्या घोषणा होणार?

आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे अर्थसंकल्प सादर करतील. यावेळी सरकार कोणकोणत्या घोषणा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पार्श्वभूमी

राज्य सरकार आज (28 जून) आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. अर्थमंत्री अजित पवार या अर्थसंकल्पातील तरतुदींची माहिती देतील. या वेळच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील सत्ताधारी महायुतीला चांगलाच फटका बसला. असे असतानाच आता आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मुस्लीम समाजाने महायुतीकडे पाठ फिरवली. असे असतानाच आता आज राज्याचा आर्थसंकल्प सादर होत आहे. सरकार या अर्थसंकल्पात महिला, तरुण, शेतकरी या वर्गासाठी मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याच अर्थसंकल्पात राज्य सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचीही घोषणा करण्याची शक्यता आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.