LPG Gas Rates Today : आजपासून नोव्हेंबर (November) महिना सुरु झाला आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे, आज 1 नोव्हेंबर 2022 रोजी एलपीजीच्या दरांत (LPG Rates) घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.  केंद्र सरकारनं एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र, देशभरातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात (Commercial Cylinder Price) ही कपात झाली आहे. आज (मंगळवार) 1 नोव्हेंबर 2022 पासून 19 किलोचा व्यावसायिक LPG सिलेंडर 115.50 रुपयांनी स्वस्त झाला आहे. पण, घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. 6 जुलैपासून घरगुती सिलेंडरच्या किंमत स्थिर आहेत. 


महानगरांमध्ये व्यावसायिक सिलिंडरचे नवीन दर काय? 


दिल्लीत 19 किलोच्या इंडेन एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत आता 1744 रुपये झाली आहे, जी पूर्वी 1859.5 रुपये होती. 
मुंबईत 1844 मध्ये व्यावसायिक सिलेंडर उपलब्ध होते, ते आता 1696 रुपयांना मिळणार आहेत. 
चेन्नईमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरची किंमत आता 1893 रुपये आहे, ज्यासाठी पूर्वी 2009.50 रुपये मोजावे लागत होते. 
आता कोलकातामध्ये व्यावसायिक सिलेंडरची किंमत 1846 रुपये असेल, जी आधी 1995.50 रुपये होती.


जनतेला दिलासा देत सरकारनं व्यावसायिक एलपीजीच्या किमती कमी केल्या आहेत. मात्र, घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. सरकारनं व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 115.50 रुपयांनी कमी केली आहे.  


14.2 किलो घरगुती सिलेंडरचे नवे दर काय? 


दिल्लीत घरगुती सिलिंडरची किंमत 1053 रुपये आहे. तर 14.2 किलोचा सिलेंडर कोलकात्यात 1079 रुपये, चेन्नईमध्ये 1068.5 आणि मुंबईत 1052 रुपयांना उपलब्ध आहे. भारतातील गॅस कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत निश्चित करतात. 


दर महिन्याच्या पहिल्या दिवशी किंमत ठरते 


देशातील गॅस कंपन्या प्रत्येक महिन्याच्या पहिल्या दिवशी 14 किलो घरगुती आणि 19 किलो व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत निश्चित करतात. यापूर्वी 1 ऑक्टोबर रोजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात 25.5 रुपयांची कपात करण्यात आली होती. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरांत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Petrol Diesel Price Today: महिन्याच्या पहिल्या दिवशी ग्राहकांना झटका? पेट्रोल-डिझेल दराबाबत मोठी अपडेट