एक्स्प्लोर

LPG Price Today : एलपीजी सिलेंडरच्या दरात कपात, आजचे दर पाहा...

LPG Gas Cylinder : नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

LPG Gas Cylinder : ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीलाच एलपीजी गॅस सिलेंडरच्या (LPG Rate) दरात बदल झाला आहे. नवे इंधन दर जारी झाले असून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या (Commercial Gas Cylinder) दरात कपात करण्यात आली आहे, मात्र घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहाव्या महिन्यात घट झाली आहे. दरम्यान नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरात घट

आजपासून व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत घट झाली असून आजपासून 19 किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत कमी झाली आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात मुंबईमध्ये 32.50 रुपये, दिल्लीमध्ये 25.50 रुपये, कोलकातामध्ये 36.5 रुपये तर चेन्नईमध्ये 35.5 रुपयांनी कमी झाले आहेत. यामुळे मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये किमतीला मिळेल. तर घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नसून घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर त्याच दरात मिळतील.

घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर 'जैसे थे'

व्यावसायिक सिलेंडरच्या दरात सलग सहा महिने कपात करण्यात आली आहे. घरगुती सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मे महिन्यात व्यावसायिक सिलेंडरचे दर 2354 रुपयांपर्यंत पोहोचले होता. मुंबईमध्ये आता व्यावसायिक सिलेंडरचा दर 1811.50 रुपये इतका असेल. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी सिलेंडरचा दर 25.50 रुपयांनी कमी झाल्याने 1859.50 रुपये किमतीला असेल. कोलकातामध्ये गॅस सिलेंडरचा दर 1959 रुपये तर चेन्नईमध्ये 2009 रुपये झाला आहे.

नैसर्गिक वायूच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ

जागतिक बाजारात शुक्रवारी नैसर्गिक वायूच्या किमतीत विक्रमी 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वीजनिर्मिती, खतनिर्मिती आणि वाहने चालवण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस  महाग होण्याची शक्यता आहे. वायू क्षेत्रातून तयार होणाऱ्या गॅससाठी द्यावा लागणारा दर 8.57 प्रति दशलक्ष डॉलरपर्यंत वाढवण्यात आला आहे. हा दर आधी 6.1 प्रति दशलक्ष डॉलर ब्रिटिश थर्मल युनिट (MBTU) होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe: ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
ॲनालॉग पनीर काय आहे, 1 वर्षांनंतरही बंदी वाढवणार का? तुकाराम मुंढेंनी सगळं सांगितलं, म्हणाले, आरोग्याशी तडजोड नाही
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
कर्जदारांना दिलासा... महागाईचा दबाव कायम, तरी रेपो दर जैसे थे; आरबीआयची 'वेट अँड वॉच' भूमिका कायम
Mhada house Lottery Mumbai: मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
मोठी बातमी: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांची लॉटरी जाहीर होण्याची तारीख अखेर ठरली, ऑनलाईन सोडत कधी आणि कुठे पाहता येणार?
Dabur Products Ban : 'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?
'डाबर'च्या अनेक उत्पादनांवर FSSAI च्या कारवाईची टाच, 100 टक्के शुद्धतेच्या दाव्यावर आक्षेप; थेट विक्रीवर घातली बंदी, नेमकं कारण काय?

व्हिडीओ

Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?
Sunil Tatkare On Congress : काँग्रेसने वैचारिक दिवाळखोरी दाखवली; सुनील तटकरेंचा घणाघाती हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक
Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
मुख्यमंत्र्यांनी 3 वर्षांपूर्वी उद्घाटन केलेला पूल गेला वाहून; ठेकेदारावर गुन्ह्याची मागणी, रोहित पवारांची खोचक टीका
Embed widget