एक्स्प्लोर

LPG Rule Change : कोट्यवधी LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी, 1 ऑक्टोबरपासून गॅस सिलेंडरचा 'हा' नियम बदलणार, जाणून घ्या

LPG Rule Change: एलपीजी गॅस सिलेंडरवर मिळणारं अनुदान मिळवायचं असेल तर ग्राहकांना आधार बेस्ड पडताळणी करणं अनिवार्य करण्यात आलं आहे.  

LPG Rule Change नवी दिल्ली: देशातील कोट्यवधी घरगुती एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही घरगुती गॅस सिलेंडरचा वापर करत असाल तर तुम्हाला सरकारकडून मिळणारी सब्सिडी सुरु ठेवण्यासाठी आधार प्रमाणीकरणाद्वारे ई केवायसी करावी लागणार आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून सब्सिडीच्या दरात एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी ग्राहकाची आधार पडताळणी पूर्ण झालेली असणं आवश्यक आहे.एलपीजी गॅस कनेक्शन ज्या ग्राहकाच्या नावावर आहे, तोच व्यक्ती त्या कनेक्शनचा वापर करतोय का आणि सब्सिडीचा फायदा योग्य व्यक्तीला मिळतोय हे निश्चित करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.  

1 ऑक्टोबरपासून काय बदलणार?

आतापर्यंत ज्या एलपीजी ग्राहकांनी आधारद्वारे पडताळणी म्हणजे ई केवायसी केलेली नाही त्यांना सरकारनं वेळ वाढवून दिला होता. सरकारनं यापूर्वी 30 जून 2026 पर्यंत ई केवायसी करण्यास सांगितलं होतं. मात्र, नंतर सरकारनं मुदतवाढ दिली. जर तुम्हाला एलपीजी सब्सिडीचा फायदा घ्यायचा असेल आणि अजूनही ई केवायसी किंवा आधार प्रमाणीकरण पूर्ण केलं नसेल तर ते पूर्ण करावं लागेल. ज्या ग्राहकांनी ई केवायसी केली असेल त्यांना पुन्हा ती प्रक्रिया पूर्म करण्याची गरज नाही.  

बायोमेट्रिक आधार पडताळणी म्हणजेच आधार द्वारे करण्यात आलेली पडताळणी होय. यामध्ये आधार क्रमांकासह तुमची ओळख पटवली जाते. यामध्ये बायोमेट्रिक पद्धतीनं आधार पडताळणी करावी लागते. म्हणजेच अंगठ्याच्या किंवा बोटांचे ठशांद्वारे प्रमाणीकरण करावं लागतं.  

सरकारच्या आकडेवारीनुसार 19 सप्टेंबर 2026 पर्यंत 27 कोटी 43 लाख सक्रीय घरगुती एलपीजी ग्राहकांची आधार बेस्ड बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण झाली आहे. ही संख्या एकूण ग्राहकांच्या 89.9 टक्के आहे. म्हणजेच 90 टक्के लोकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, अजून थोडे ग्राहक आहेत त्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. 

आधार पडताळणी न केल्यास काय होणार? 

समजा एखाद्या ग्राहकानं आधार बेस्ड पडताळणी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्याला एलपीजी गॅस सिलेंडर मिळतील. मात्र, जोपर्यंत आधार प्रमाणीकरण करत नाही तोपर्यंत अनुदान असलेले गॅस सिलेंडर त्याला मिळणार नाहीत, बाजारभावाप्रमाणे गॅस सिलेंडर घ्यावा लागेल.

सरकारच्या आकडेवारीनुसार सप्टेंबर 2026 मध्ये एका घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरवर 210 रुपयांचं अनुदान दिलं जात आहे. जून 2026 मध्ये सब्सिडीची रक्कम 721 रुपयांवर पोहोचली होती. सब्सिडीची रक्कम नियमितपणे बदलत असते.  

सरकारच्या माहितीनुसार एलपीजी सब्सिडीसाठी तेल कंपन्यांना आर्थिक वर्ष 2025-26 आणि 2026-27 या वर्षात दरवर्षी 30 हजार कोटी रुपये दिले जात आहेत.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Diesel : भारताच्या तिजोरीत मोठी भर पडणार! डिझेलची निर्यात वाढणार, आंतरराष्ट्रीय बाजारात मजबूत स्थान 
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
Microsoft Layoffs : मायक्रोसॉफ्टच्या निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना नोकरी सोडण्यास सांगणार, भारतातील कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढलं
मायक्रोसॉफ्टच्या एका निर्णयानं खळबळ, 60000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार, भारतात मायक्रोसॉफ्टचे किती कर्मचारी? 
Jio Platforms IPO: जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर, शेअर बाजारात अंदाजित मार्केट कॅपनुसार चौथ्या स्थानावर पोहोचणार
जिओचा आयपीओ 28 ऑक्टोबरला लिस्ट होणार, IPO चं मूल्यांकन 10.3 लाख कोटींवर 
Advertisement

व्हिडीओ

Nilesh Chandramuni Mumbai : कबुतरखाना वादानंतर निलेश चंद्रमुनींचा राज ठाकरेंना पाठिंबा : ABP Majha
Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar : 'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
'मिनाक्षी शिंदेला पाठीशी का घातलं जातंय? तिला फरफटत पोलीस स्टेशनला आणल्याशिवाय हटणार नाही'; विजेता पूर्णेकर संतापल्या, एकनाथ शिंदेवरही भडकल्या
Gold Price: सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
सोन्याच्या दरात घसरण सुरुच मात्र 2027 मध्ये सोनं 2 लाखांचा टप्पा पार करणार, तज्ज्ञांचा मोठा अंदाज
Pune Teacher Election Result : लोकशाहीतील मतदानाच्या परीक्षेत तब्बल 1675  गुरुजींची मतं बाद, पुणे शिक्षकमधील धक्कादायक आकडेवारी समोर
पुणे शिक्षकच्या निवडणुकीत 1675  गुरुजींची मतं बाद, मतमोजणीवेळी धक्कादायक आकडेवारी समोर
Indian Railway Travel Insurance : अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
अवघ्या 45 पैशांत 10 लाखांचा विमा! रेल्वेचा हा 'मास्टरप्लॅन' कसा चालतो? कसा क्लेम कराल? 
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
महाराष्ट्राला 5 टीएमसी पाणी मिळणार; नर्मदा जलविवाद निवाड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या मागणीवर जलशक्ती मंत्र्यांचे निर्देश
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मिनाक्षी शिंदेंची 7 तास चौकशी; चौकशीनंतर पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या, आजही तीच भूमिका
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
बीडमध्ये 107 वर्षांत पहिल्यांदाच दुष्काळाची भीषण दाहकता; खजाना विहीर ऑक्टोबरमध्येच आटली, जलसंकटाचे संकेत
Pradeep Purnekar : राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
राज्याच्या गृहमंत्र्याला पोलीस जर 100 दिवस कोठडीत ठेवू शकतात तर मग मिनाक्षी शिंदेला अटक का करत नाहीत? प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीचा सवाल
Embed widget