Liquor News : 2023 वर्ष संपायला अवघे काही तास उरले आहेत. त्यानंतर नवीन वर्ष 2024 सुरू होईल. दरम्यान, 2023 या वर्षात मद्यपींनी दारु पिऊन चांगलीच उधळपट्टी केली आहे. या वर्षाच्या केवळ 9 महिन्यातच नोएडातील लोकांनी करोडोंची दारु प्यायली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार, नोएडातील लोकांनी 1 एप्रिल ते 29 डिसेंबर या 9 महिन्यांत 1,308.59 कोटी रुपयांची दारु पिले आहेत. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा 1,125.12 कोटी रुपयांचा होता.


नोएडातील लोकांनी यावर्षी दारु पिण्याच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यावर्षी एप्रिल ते डिसेंबर 29 या कालावधीत येथील लोकांनी कोट्यवधींची दारु प्यायली आहे. उत्पादन शुल्क विभागानं याबाबतची आकडेवारीनुसार सांगितली आहे. 2023 मध्ये मद्यविक्रीत सुमारे 16.30 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, जर तुम्हाला यूपी नोएडामध्ये हाऊस पार्टी आयोजित करायची असेल, तर तुम्हाला त्यासाठी परवाना घ्यावा लागेल.


नवीन वर्षात मोडणार विक्रम


उद्यापासून नवीन वर्ष सुरू होत असताना येथे दारुची विक्री प्रचंड होईल, असा विश्वास उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षात सुमारे 12 कोटी रुपयांची दारू विकली जाण्याची शक्यता आहे. गेल्या वेळी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी येथील लोकांनी 9 कोटींहून अधिक किंमतीची दारू प्यायली होती. यावेळी हा आकडा लक्षणीय वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हा नवा विक्रमही होऊ शकतो.


तस्करी रोखण्यासाठी प्रयत्न केले जातायेत


जिल्हा उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडा गाझियाबादमध्ये 439 दारूची दुकाने आहेत. ज्यात देशी दारु, इंग्रजी दारु आणि बिअर शॉपचा समावेश आहे. ते म्हणाले की, दारू तस्करी रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सातत्याने प्रयत्न करत आहे. नवीन वर्षात दारूची तस्करी होऊ नये यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. नुकताच यूपीमध्ये घरोघरी पार्ट्यांमध्ये दारू देण्याचा नवा नियम करण्यात आला आहे. त्यानुसार, मद्य सेवा देण्यासाठी आता अधूनमधून परवाना घेणे आवश्यक आहे. जे दोन श्रेणींमध्ये उपलब्ध आहेत. प्रथम, कमी लोकांसाठी म्हणजेच घरगुती पार्टीसाठी, दररोज 4,000 रुपये परवाना उपलब्ध असेल. दुसरा परवाना 11,000 रुपयांचा असेल ज्यामध्ये कम्युनिटी हॉल, रेस्टॉरंट आणि इतर गर्दीच्या ठिकाणी पार्ट्यांमध्ये दारू दिली जाऊ शकते. त्याची वैधताही एक दिवसाची असेल.


महत्त्वाच्या बातम्या:


Liquor Price : दारुच्या बाटलीची खरी किंमत किती? किती रुपये जास्त देऊन दारु खरेदी करता माहीत आहे का?