Pune News : महाराष्ट्रातून आतापर्यंत 17 प्रकल्प बाहेर गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री खोटे आकडे देत आहेत. ते तोंड शिवून बसले आहेत. दहशतीखाली उद्योगपती यांना घेऊन चालले आहेत. मुंबईची (Mumbai) वाट लावण्याचे धोरण हे सरकार करत आहे. आमच्या मराठी लोकांच्या तोंडाचा घास पळून लावत आहेत. नरेंद्र मोदी (PM narendra modi) म्हणतात आधी गुजरातचा विकास मग देशाचा, कुठल्याही पंतप्रधान यांनी असे भाष्य केले नव्हते. तुम्ही देशाचे पंतप्रधान आहात एका राज्याचे नाहीत. मी म्हणतो त्यांनी गुजरातला सोन्यानं मढवून द्वारका करा, आमचं काहीच म्हणणं नाही. आधी गुजरातचा विकास आणि मग देशाचा विकास अशी भाषा देशाचे पंतप्रधान करतात..असं कुणीच कधी बोललं नाही.  आमचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री लाचार झाले आहेत. नारायण राणे यांच्यातही ताकद नाही की उद्योग बाहेर चालले आहेत त्यावर बोलावे, असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलाय. ते पुण्यात बोलत होते. नारायण राणे, एकनाथ शिंदे शिवसेनामध्ये होते ना तर त्यांनी तो बाणा दाखवावा. अजित पवार तुम्ही शरद पवार यांचे नाव सांगता, मग सांगा ना की राज्यातून एक ही प्रकल्प बंद होऊ देणार नाही म्हणून असेही राऊत म्हणाले. 


योग्य वेळी बोलू -


राम मंदिर सोहळा आनंदाचा क्षण आहे. देशाचा सोहळा पाहिजे हा तर आता भाजप सोहळा झाला आहे. भाजपने राम मंदिर सोहळा राजकीय केलाय. अक्षदा वाटत आहेत की जणू एक लग्न सोहळा आहे. राम मंदिरासाठी शिवसेनेने बलिदान दिले त्याला आम्हाला कुठले ही गालबोट लावायचे नाही पण आम्ही योग्य वेळी बोलू, असा इशारा यावेळी संजय राऊतांनी दिला. 
 
 मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका 


महा विकास आघाडीमध्ये जिंकेल त्याची जागा आहे. जयंत पाटील यांनी शिवसेनेशी चर्चा केली आहे. जागा वाटपाचा संदर्भात कोणताही मतभेद नाही. मुंबईत कोण काय बोलतात यावर जाऊ नका, असे राऊत म्हणाले. प्रकाश आंबेडकर सकारात्मक आहेत. हुकुमशाही बदलून टाकण्यासाठी ते ठाम आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या सभा बघितल्या असतील तर ते लढाई मध्ये उतरले आहेत. सामंजस्य पणे ते भूमिका बजावत आहेत, असे संजय राऊत म्हणाले. 


 हे सरकारचं अपयश -


शेतकऱ्यांची दुरावस्था ही सरकारचं हे अपयशच आहे. महाराष्ट्राचं सरकार जो मोदी मोदी करतायत, त्यातले शिंदे आणि अजित पवार कालपर्यंत त्यांच्या शेतकरी धोरणावर टीका करत होते. विदर्भात गेल्या दीड वर्षांत 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. अजूनही जर हे सरकार म्हणत असेल की सगळं काही आलबेल आहे तर ते खोटं बोलतायत
गेल्या दोन वर्षांत काय केलं तर फक्त आमदार-खासदारांचा भाव वाढवला, असे संजय राऊत म्हणाले. 


महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा प्रयत्न


हे सरकारच रेव्ह पार्टी आहे. सरकार म्हणेजच रेव्हपार्टीतून निर्माण झालंय. अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे. गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येतायत. महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा प्रयत्न आहे. देशात भाजपचं सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटींचं ड्रग्स गुजरातच्या बंदरातून पकडलं आहे. तुम्ही या देशातील तरूणांना नशेत धुत करून राज्य करू इच्छिताय का? असे राऊत म्हणाले.