Liquor company : भारतात दारुचा (Liquor) विचार केला तर सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे विजय मल्ल्या (vijay mallya). पण तुम्हाला माहित आहे का, की देशातील सर्वात मोठी दारु कंपनी एक महिला चालवते. एवढेच नाही तर या कंपनीने विजय मल्ल्याचा व्यवसायही विकत घेतला आहे. हिना नागराजन (Hina Nagarajan) असं या महिला उद्योगपतीचं नाव आहे.
एकेकाळी भारतातील सर्वात मोठ्या दारु व्यावसायिकांपैकी एक असलेला विजय मल्ल्या देश सोडून पळून गेला होता. त्यानंतर त्याचा दारुचा व्यवसाय दुसऱ्या कंपनीने विकत घेतला. या कंपनीच्या सीईओ या हिना नागराजन आहेत. हिना नागराजन या डियाजिओ इंडिया (Diageo India) ही दारुची कंपनी चालवतात. हिना नागराजन हे देशातील सर्वात मोठ्या दारु कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीच्या सीईओ आहेत. त्या केवळ कंपनीची सीईओच नाहीत तर व्यवस्थापकीय संचालक देखील आहेत.डियाजिओ इंडियाच्या प्रमुख या नात्याने हिना नागराजन या कंपनीच्या नफ्या तोट्यासह कॉर्पोरेट गव्हर्नन्स, गुंतवणूक यापर्यंतचे काम पाहतात. भारतातील व्यवसाय प्रमुख होण्यापूर्वी हिना यांनी डियाजिओच्या आफ्रिका इमर्जिंग मार्केट क्षेत्राचे नेतृत्व केले आहे.
30 वर्षांचा व्यवसाय चालवण्याचा अनुभव
हिना नागराजनची सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे डियाजिओपूर्वी त्यांनी FMCG क्षेत्रात सुमारे 30 वर्षे काम केलं आहे. त्यांनी Reckitt Benckiser ची मूळ कंपनी Reckitt, Mary Kay India आणि Nestle सारख्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदावर काम केलं आहे.
अभ्यासातही अव्वल
व्यवसाय चालवण्यात पारंगत असण्यासोबतच हिना नागराजन या अभ्यासातही टॉपर आहे. त्यांनी दिल्ली विद्यापीठातून बी. कॉमची पदवी घेतली आहे. त्यानंतर आयआयएम अहमदाबादमधून एमबीए केले आहे. जुलै 2021 मध्ये त्यांना Diageo चे MD आणि CEO बनवण्यात आले. यानंतरच डियाजिओने विजय मल्ल्या यांची युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड कंपनी विकत घेतली.
आयपीएलच्या संघाची मालकी
डियाजिओ इंडियाने आयपीएलचा एक संघ देखील खरेदी केला आहे. डियाजिओ इंडियाने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ विकत घेतला आहे. या संघाची एकूण संपत्ती 8500 कोटी रुपये आहे. विराट कोहली दीर्घकाळ या संघाचा कर्णधार होता. तो अजूनही या संघाचा सदस्य आहे.
महत्त्वाच्या बातम्या: