LIC News : भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून (LIC) 6 हजार 103 कोटी रुपयांचा लाभांश भारत सरकारला (India Govt) सुपुर्द करण्यात आला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षासाठी एलआयसीकडून (LIC) काल अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Finance Minister Nirmala Sitharaman) यांना 3 हजार 662 कोटी रुपयांचा लाभांश देण्यात आला आहे. सोबतच 1 मार्च 2024 रोजी देखील एलआयसीकडून 2023-24 साठी 2 हजार 241 कोटी रुपयांचा लाभांश दिला गेला होता. असा एलआयसीकडून एकूण यंदा 6 हजार 103 कोटींचा लाभांश दिला गेला आहे. 


कंपनीने या तिमाहीत 10544 कोटींचा निव्वळ नफा कमावला 


LIC ने जून 2024 ला संपलेल्या पहिल्या तिमाहीचे त्रैमासिक निकाल देखील जाहीर केले आहेत. कंपनीने या तिमाहीत 10544 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो मागील वर्षीच्या याच तिमाहीत 9635 कोटींच्या नफ्यापेक्षा 9 टक्के जास्त आहे. याशिवाय, कंपनीचे एकूण प्रीमियम कलेक्शन देखील वार्षिक आधारावर 16 टक्क्यांनी वाढून 1.14 लाख कोटी रुपये झाले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत हे 98,755 कोटी रुपये होते.


महाराष्ट्रात LIC कडून कराची मागणी


दुसरीकडे, LIC ला महाराष्ट्रात GST व्याज आणि दंडाची नोटीस मिळाली आहे. महाराष्ट्र सरकारने 2019-20 या आर्थिक वर्षासाठी ही नोटीस पाठवली आहे. एलआयसीनुसार, जीएसटीची रक्कम 2,94,43,47,220 रुपये, व्याज 2,81,70,71,780 रुपये आणि दंड 29,44,73,582 रुपये आहे. एलआयसी या नोटीसविरुद्ध मुंबईतील सहआयुक्त (अपील) यांच्याकडे दाद मागू शकते.


महत्वाच्या बातम्या:


LIC ची भन्नाट योजना, एकदा गुंतवणूक करा, आयुष्यभर 1 लाख रुपये पेन्शनची हमी मिळवा, जाणून घ्या सविस्तर माहिती