Astrology Panchang 30 August 2024 : आज 30 ऑगस्ट शुक्रवारचा दिवस फार चांगला आहे. आज श्रावण (Shravan) महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी आहे. तसेच, आजच्या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग (Yog), व्यतिपात योग आणि पुनर्वसु नक्षत्र अशा शुभ योगांची निर्मिती झाली आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. 


वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ धनुसह 5 राशींच्या लोकांना होणार आहे. या राशींच्या लोकांना गुंवणुकीतून चांगला लाभ मिळेल. तसेच, शुक्र ग्रहाची स्थिती मजबूत असल्या कारणाने देवी लक्ष्मीचाही तुमच्यावर आशीर्वाद असणार आहे. त्यामुळे या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 


वृषभ रास (Taurus Horoscope)


वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक आहे.आज तुम्ही अनपेक्षित संपत्ती मिळवू शकतात. आज ग्राहकांच्या चांगल्या पाठिंब्यामुळे व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळणार आहे. आज तुम्ही एखाद्या जुन्या मित्राला भेटाल. तुमचं घरगुती वातावरणही चांगलं राहील. लव्ह लाईफ सुरु असलेल्या लोकांना आज रोमँटिक डिनरला जाण्याची संधी मिळेल.


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस आनंददायी असणार आहे. कन्या राशीच्या लोकांना आज सूर्यदेवाच्या कृपेने तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतांमध्येही वाढ होईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. दुकानदार आणि व्यावसायिकांना आज चांगला नफा मिळेल आणि त्यांना व्यवसाय वाढवता येईल. आज जमीन आणि वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होईल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रेम आणि पाठिंबा मिळेल.


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप शुभ असणार आहे. वृश्चिक राशीच्या लोकांना आज त्यांच्या मुलांकडून किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडून चांगली बातमी मिळू शकते. नोकरदार लोक रविवारच्या सुट्टीचा आनंद घेतील आणि पुढच्या दिवसाचे नियोजनही करतील. आज तुम्ही तुमच्या चैनीच्या वस्तूंवर थोडे पैसे खर्च करू शकता आणि कुटुंबातील सदस्यासाठी नवीन तंत्रज्ञान किंवा मोबाईल लॅपटॉप किंवा इतर गॅझेट खरेदी करू शकता.


धनु रास (Sagittarius Horoscope)


आजचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी आशेचा नवा किरण घेऊन आला आहे.धनु राशीच्या लोकांना आज सकाळपासून चांगली बातमी ऐकायला मिळेल आणि तुमचं आरोग्यही सुधारेल. आज तुम्हाला नवीन ठिकाणांना भेट द्यायला आवडेल. आज तुमच्या कामाचं सर्वत्र कौतुक होईल. नशिबाने साथ दिल्याने तुमच्या अडचणी दूर होतील आणि आर्थिक लाभाच्या अनेक चांगल्या संधीही मिळतील. आज घरातील वातावरण चांगलं राहील.


मीन रास (Pisces Horoscope)


आजचा दिवस मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. आज मीन राशीच्या लोकांचं प्रेमळ वर्तन लोकांची मनं जिंकेल. आज तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींच्या मदतीने घरातील राहिलेली कामं पूर्ण करता येतील आणि आज तुम्हाला अडकलेले पैसे मिळण्याचीही शक्यता आहे. डोळ्यांशी संबंधित कोणतीही समस्या तुम्हाला भेडसावत असेल तर ती आज नक्कीच सुधारेल. आज तुम्ही तुमच्या रागावलेल्या जोडीदाराला शांत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Horoscope Today 30 August 2024 : आजचा शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी नेमका कसा असेल? वाचा सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य