Layoffs in 2023 : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून जगभरात नोकरकपातीचा ट्रेंड सुरु झाला आहे. गूगल (Google), मायक्रोसॉफ्टसह (Microsoft) अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना (Employees Layoffs) नारळ दिला आहे. जगभरात आतापर्यंत 332 टेक कंपन्यांनी एक लाखांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना (Employees Layoffs) नोकरीवरुन काढून टाकले आहे. सतत नोकर कपातीच्या बातम्या येऊ लागल्यानंतर जगात महामंदी येणार अशी चर्चा सुरु झाली. तसा अंदाजही अनेकांनी वर्तवला आहे. नोव्हेंबर 2022 मध्ये ज्या पद्धतीनं नोकऱ्या गेल्या, त्याच पद्धतीनं नोकरकपातीचा ट्रेण्ड नव्या वर्षातही दिसला.
2023 च्या सुरुवातीला अनेक कंपन्यांनी हजारो कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलं आहे. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1,00,746 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. यात 332 कंपन्याचा समावेश आहे. जगभरात मोठ्या धुमधडाक्यात नव्या वर्षांचं स्वागत झालं. पण, हे सेलिब्रेशन फार काळ टिकलं नाही. 2023 च्या सुरुवातीला आयटी क्षेत्रातल्या अनेकांचा रोजगार गेला आहे. गेल्या वर्षाच्या शेवटीच जगात जागतिक मंदीचा अंदाज वर्तवला जात होता आणि अगदी तशीच सुरुवात झाली. एक जानेवारीपासून आतापर्यंत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त जणांचा रोजगार गेला आहे.
या कंपनीनं सर्वात जास्त कर्मचाऱ्यांना नारळ दिला
जानेवारी महिन्यात मोठ्या प्रमाणात नोकरकपात केली. गूगलने ( Google) सहा टक्के नोकरकपात केली. गूगलनं 12 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला, जी आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. त्याशिवाय मायक्रोसॉफ्ट (Microsoft) कंपनीने 10,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. त्याशिवाय अॅमोझॉन कंपनीने आठ हजार कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलेय.
सेल्सफोर्स कंपनीने आपल्या आठ हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला आहे. तर डेल कंपनीने 6650, आयबीएम कंपनीने जवळपास 3900, SAP कंपनीने 3 हजार, झूम कंपनीने जवळपास 1300 आणि कॉइनबेस कंपनीने 950 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकलेय. Yahoo ने नुकतेच 20 टक्के कर्मचारी कपात करणार असल्याचं जाहीर केलेय. त्याशिवाय 8 टक्के अथवा 600 कर्मचाऱ्यांना नोकरी देणार असल्याचेही सांगितलेय.
Microsoft च्या मालकीची GitHub या कंपनीनेही 10 टक्के अथवा 300 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार असल्याचं सांगितलेय. त्याशिवाय गोडॅडी कंपनीने आठ टक्के कर्मचारी कपात करणार असल्याची माहिती दिली आहे.
2023 मध्ये कोणत्या कंपनीनं कर्मचारी कपात केती ?
मायक्रोसॉफ्ट कंपनीने 10,000 कर्मचारी
अॅमेझॉनने 8 हजार कर्मचारी
सेलफोर्सने 8000 कर्मचारी
Dell कंपनीने 6650 कर्मचारी कपात केली
IBM ने 3,900 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.
SAP ने 3 हजार कर्मचाऱ्यांना काढलेय.
Zoom ने 1,300 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.
कॉइनबेस ने 950 कर्मचारी कपात केली
Yahoo ने 1,600 कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय.
GitHub ने 300 कर्मचारी कपात केली
आणखी वाचा :
मंदीचा फटका! गोल्डमन सॅच कंपनी 3,200 कर्मचार्यांना कामावरून काढून टाकण्याच्या तयारीत
Layoffs in January : जानेवारीतही नोकरकपातीचा ट्रेण्ड, 15 दिवसांत गेला तब्बल 24 हजारांचा रोजगार