Goldman Sachs : जगभरात वाढत्या महागाईमुळे आर्थिक मंदीची ( Recession ) गडद छाया तयार झाली आहे. आर्थिक मंदीचा सामना करणाऱ्यासाठी अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात करण्यास सुरुवात केली आहे. नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच कर्मचाऱ्यांच्या कपातीला सुरूवात झालीय. 2023 मध्ये अनेक मोठ्या कंपन्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवत आहेत. आता या यादीत अमेरिकन इन्व्हेस्टमेंट बँकिंग कंपनी गोल्डमन सॅच ग्रुप इंकचेही (Goldman Sachs) नाव समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोल्डमन सॅक्स ग्रुप इंक कंपनी 3,200 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. ही कंपनी बुधवारपासूनच कामगारांच्या कपातीला सुरूवात करू शकते.
ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गोल्डमन सॅच ग्रुप इंकने यावेळी हजारो लोकांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखली आहे. यामध्ये गुंतवणूक बँकिंग विभागात जास्तीत जास्त कपात केली जाईल. आतापर्यंत कंपनीने या कपातीबद्दल कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु अहवालानुसार, कंपनी 3,200 लोकांना कामावरून काढून टाकू शकते. डिसेंबरच्या शेवटच्या तिमाहीतील आकडेवारीनुसार कंपनीत एकूण 49,100 कर्मचारी कार्यरत आहेत. सध्याच्या परिस्थितीत बुधवारपासून 6.5 टक्के कर्मचाऱ्यांची कपात केली जाऊ शकते. आकडेवारीनुसार, गोल्डमन सॅचने कोरोना महामारीच्या काळात अनेक नवीन भरती केली होती. परंतु, मंदीचे सावट येण्याच्या शक्यतेने बँक आपल्या अनेक विभागांमधील कर्मचाऱ्यांची कपात करण्याची योजना आखत आहे.
या कंपन्या देखील कपात करून शकतात
गोल्डमन सॅच व्यतिरिक्त, Amazon, Google Layoffs आणि Microsoft सारख्या कंपन्या देखील पुन्हा एकदा मर्चारी कपात करण्याचा विचार करत आहेत. द इन्फॉर्मेशनच्या अहवालानुसार, कंपनी आपल्या किमान 6 टक्के कर्मचार्यांना कमी करू शकते. त्यामुळे किमान 11 हजार कर्मचाऱ्यांचा रोजगार धोक्यात आला आहे. यासोबतच कर्मचाऱ्यांच्या बोनस आणि पगारावर रेटिंग लागू करून गुगल आपला खर्च कमी करण्याचा प्रयत्न करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून 15,3110 तांत्रिक कर्मचार्यांनी त्यांच्या नोकऱ्या गमावल्या होत्या. नोव्हेंबर महिन्यात हे प्रमाण 51.489 पर्यंत वाढले आहे. Meta, Twitter, Oracle, Navida, Snap, Uber इत्यादी अनेक मोठ्या कंपन्यांनी 2022 मध्ये काम बंद केले आहे.
दरम्यान, मागील वर्षी देखील अनेक मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केली होती. यावर्षीही देखील कंपन्यांना कर्मचारी कपात सुरू केली आहे.
महत्वाच्या बातम्या