Gold Price News : सोन्या चांदीच्या (Gold Silver) दरात सातत्यानं चढ उतार होत आहे. कधी सोन्याचे दर उसळी घेतात तर कधी काही प्रमाणात दर कमी होतात. दरम्यान, गेल्या 12 दिवसात सोन्याच्या आणि चांदीच्या दरात (Gold Silver Price) काही प्रमाणात घट झाली आहे. हा सर्वसामान्य नागरिकांना दिलासा आहे. मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 12 दिवसात चांदीच्या दरात तब्बल 6 हजार रुपयांची घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि आखाती देशातील युद्धाच्या सावटाचा या दरावर परिणाम झाला आहे. दरम्यान, दरात घसरण झाल्यामुळं बुलढाणा जिल्ह्यातील खामगावमधील बाजारपेठेत सोनं खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. 


आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदीचा दरावर परिणाम


गेल्या काही दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत आहे. याचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. मात्र, मागच्या चार पाच दिवसापासून काही प्रमाणात सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र दिसत आहे.  आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मंदी आणि आखाती देशातील युद्धाच्या सावटाचा थेट परिणाम सोन्या चांदीच्या दरावर होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 


सध्या देशात लग्नसराईचे दिवस


दरम्यान, सध्या देशात लग्नसराईचे दिवस सुरु आहेत. अशात मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदी होत असते. मात्र, दिवसेंदिवस सोन्याच्या आणि चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत होतं. त्यामुळं सोन्या चांदीची खरेदी करणं सर्वसामान्यांना परवडत नव्हते. सोनं खरेदी करावं की नको अशी स्थिती झाली होती. मात्र, काही प्रमाणात दरात घसरण झाल्यानं सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 


सराफा बाजारात सोन्याचे दर हे 70000 रुपयांच्यावर


सध्या सराफा बाजारात सोन्याचे दर हे 70000 रुपयांच्या वर आहेत. मात्र, पुढच्या काही दिवसात दर कमी होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात चिंता व्यक्त केली जात होती. इंधनाचा दर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. याच काळात सोनंही चांगलंच महागलं होतं. दोन्ही देशांतील या तणावात सोन्याचा दर 74 हजार प्रति दहा ग्रॅमपर्यंत वाढला होता. कालानंतराने इराण-इस्रायल यांच्यातील युद्धाची शक्यता कमी होत गेली, परिणामी सोन्याचा दरही कमी होत गेला. येणाऱ्या काळात दरात घसरण होण्याची शक्यता वर्तवली जातेय.   


महत्वाच्या बातम्या:


Gold And Silver Rate Today : सोनं, चांदी झाले स्वस्त, नेमकं कारण काय? 10 ग्रॅमसाठी किती रुपये लागणार?