Horoscope Today 03 May 2024 : आजचा दिवस शुक्रवार. हा दिवस काही राशीच्या लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.


मकर रास (Capricorn Horoscope Today)


नोकरी (Job) - तुमच्या आत्मविश्वासात अधिक वाढ होऊन तो आत्मविश्वास तुमच्या कामात दिसून येईल. 


व्यापार (Business) - ज्या महिना व्यावसायिक आहेत त्यांचा आज आत्म-सन्मान जास्त पटींनी वाढेल. नवीन काम करण्यास प्रेरणा मिळेल. 


तरूण (Youth) - तुमचा जर प्रेमभंग झाला असेल तर त्यावर जास्त विचार करून तुमच्या आयुष्यातील मौल्यवान वेळ वाया घालवू नका. 


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य सामान्य असणार आहे. तुम्हाला कोणत्याच प्रकारची मेहनत घ्यावी लागणार नाही. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी (Job) - आज वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर तुमची मीटिंग होऊ शकते. अशा वेळी तुम्ही कामाप्रती असलेले तुमचे विचार सहज मांडू शकता. 


व्यापार (Business) - आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन ऑर्डर मिळू शकते. त्यामुळे तुम्ही खूप प्रसन्न असाल. 


तरूण (Youth) - तरूणांनी रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमच्या या स्वभावामुळे माणसं तुमच्यापासून दुरावतात. 


आरोग्य (Health) - आज तुम्हाला चेहऱ्याशी संबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे डॉक्टरांशी संपर्क साधा. 


मीन रास  (Pisces Horoscope Today)


नोकरी (Job) - तुमच्या नशीबाची साथ तुम्हाला लवकरच मिळेल. तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल.


व्यापार (Business) - जर तुम्ही व्यवसायात मेहनत घेत राहिलात तर तुम्हाला अपेक्षेपेक्षा जास्त लाभ मिळेल. 


तरूण (Youth) - तुमच्या पार्टनरबरोबर अनेक दिवसांपासून सुरु असलेले वाद आज मिटतील. त्यामुळे तुम्ही खुश असाल.


आरोग्य (Health) - तुमच्या मनात कोणत्या तरी एका गोष्टीवरून सतत तणाव जाणवू शकतो. त्यामुळे तुम्ही अस्वस्थ असाल. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Shani Jayanti 2024 : यंदाची शनि जयंती कधी? या दिवशी चुकूनही 'या' चुका करू नका; शनि देईल कर्माचं फळ, एकामागोमाग येतील संकटं