Large Crowd of Tourists : यावर्षी ख्रिसमस (Christmas) आणि नवीन वर्षाचा मोठा वीकेंड आहे. त्यामुळेच शिमला ते मनालीपर्यंत पर्यटकांची (shimla to manali Tourists) संख्या यंदा तुलनेने जास्त आहे. यातून हॉटेल्स, टॅक्सी व्यवसाय आणि बस ऑपरेटर्सना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. ख्रिसमसच्या वीकेंडला रोहतांगमधील अटल बोगद्याबाहेर अनेक किलोमीटर लांब वाहनांच्या लांबच लांब रांग दिसत आहेत. 


नववर्षाच्या सेलिब्रेशनमुळे या भागात वाहनांची वर्दळ वाढली आहेत. अशातच इंधनाच्या विक्रीतही कमालीची वाढ झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमस वीकेंडमध्ये रविवारी 28,210 हून अधिक वाहनांनी अटल बोगदा पार केला. तर शिमला आणि मनालीमधील  90 टक्के हॉटेल बुक झाली आहेत. 


टॅक्सी चालकांचं मोठं उत्पन्न


मिळालेल्या माहितीनुसार, ख्रिसमसच्या निमित्ताने शिमल्यात एका दिवसात 13 हजार वाहने धावली आहेत. सुमारे 6 हजार वाहने सोलनहून शिमला, तर 7 हजार वाहने शिमल्याहून सोलनला गेली. मनालीतही परिस्थिती तशीच होती. यामुळं पेट्रोल पंपापासून टॅक्सीचालकांपर्यंत सर्वांचे उत्पन्न वाढवण्याचे काम केले आहे. हॉटेल्ससोबतच टॅक्सीचालकांचे बुकिंगही पूर्ण क्षमतेने सुरू आहे.


रेस्टॉरंट्स 24 तास सुरु 


ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या निमित्तानं हिमाचल प्रदेशातील बहुतेक रेस्टॉरंट्स 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर फेडरेशन ऑफ हिमाचल हॉटेल्स अँड रेस्टॉरंट असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, 90 टक्के हॉटेल बुक झाली आहेत. नवीन वर्षानंतर, मनाली कार्निव्हल देखील 1 ते 6 जानेवारी दरम्यान होत आहे. त्यामुळं हॉटेल्सची कमाई भविष्यात देखील सुरु राहण्याची शक्यता आहे. शिमल्यात देखील अशीच परिस्थिती आहे. तिथेही बहुतेक हॉटेल्स बुक झाली आहेत.


बर्फवृष्टीमुळं पर्यटकांची संख्या वाढणार 


यंदा हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात 30 आणि 31 डिसेंबर रोजी बर्फवृष्टी अपेक्षित आहे. त्यामुळं पर्यटकांची ये-जा वाढणार आहे. यामुळं स्थानिक लोकांच्या उत्पन्नही वाढ होणार आहे. मात्र, मोठ्या संख्येनं लोक शिमला-मनालीकडे जात असल्यानं रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.


सध्या संपूर्ण देशभरात नाताळ (Christmas) आणि नववर्षाच्या (New Year) स्वागताची तयारी सुरु आहे. पण दुसरीकडे मागील काही वर्षांपासून धास्ती असलेल्या कोरोनाने (Covid 19)  डोकं वर काढलं आहे. सध्या देशात JN1 व्हेरियंटमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. अनेक ठिकाणी या नव्या व्हेरियंटची लागण होत आहे. त्यामुळं नागरिक चिंतेत आहेत.


महत्त्वाच्या बातम्या:


Goa Covid Cases : नाताळ आणि नवं वर्षाचं सेलिब्रेशन अन् गोव्याची सफर, पण कोविड ठरतोय का चिंतेच कारण?