Kotak Mahindra Bank Rates: कोटक महिंद्रा बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोटक महिंद्रा बँकेने आपल्या बचत खाती (Saving Accounts) आणि मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ केली आहे. यामुळे आता बँक खातेदार आणि एफडीधारकांना अधिक व्याज मिळणार आहे.


बचत खात्यावर किती व्याजदर वाढले


कोटक महिंद्रा बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात (Interest Rate) वाढ केली आहे. बँकेने आता 4 टक्के व्याजदर वाढवले ​​आहेत, जे पूर्वी 3.5 टक्के होते. बँकेचे हे नवे दर 13 जूनपासून म्हणजेच पुढील सोमवारपासून लागू होतील.


बँक FD वर किती व्याजदर वाढले


कोटक महिंद्रा बँकेने (Kotak Mahindra Bank) मुदत ठेवींवरील व्याजदरात 15 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने त्यांच्या FD वर व्याजदरात केलेली वाढ 10 जून 2022 पासून म्हणजेच उद्यापासून लागू होईल.


बँकेच्या विविध कालावधीसाठी असलेले व्याजदर जाणून घ्या


बँकेने एका वर्षापेक्षा जास्त कालावधी असलेल्या बँक एफडीवरील (Fixed Deposit) व्याजदरात वाढ केली आहे. कोटक महिंद्रा बँकेने 365-389 दिवसांच्या एफडीचे व्याजदर 5.40 टक्क्यांवरून 5.50 टक्के केले आहेत. कोटक महिंद्रा बँकेने 390 दिवसांच्या एफडीचे व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के केले आहेत. तसेच 391 दिवस ते 23 महिने म्हणजेच 2 वर्षांपेक्षा कमी कालावधीसाठी व्याजदर 5.50 टक्क्यांवरून 5.65 टक्के करण्यात आले आहेत.


इतर महत्वाच्या बातम्या: