मुंबई: शेअर बाजारात गेल्या चार सत्रापासून सुरू असलेल्या घसरणीला लगाम बसला आहे. आज शेअर बाजार काहीसा वधारला असून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्समध्ये 427 अंकांची वाढ झाली आहे तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमध्ये 121 अंकांची वाढ झाली आहे. सेन्सेक्समध्ये आज 0.78 टक्क्यांची वाढ होऊन तो 55,320 अंकांवर बंद झाला तर निफ्टी 0.74 टक्क्यांची वाढ होऊन तो 16,478 अंकांवर स्थिरावला आहे. 

एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी घसरणदेशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीच्या शेअर्समध्ये आज मोठी घसरण झाली आहे. मुंबई शेअर बाजारात आज एलआयसीचे शेअर्स 721 रुपयांवर पोहोचले असून या शेअर्सने आतापर्यंतची सर्वात निच्चांकी पातळी गाठली आहे. 

शेअर बाजाराची सुरुवात घसरणीनेभारतीय शेअर बाजाराची आजही घसरणीसह सुरुवात झाली. अमेरिकन शेअर बाजार आणि आशियाई शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून येत आला. शेअर बाजार सुरू होताना सेन्सेक्समध्ये 300 अंकांची आणि निफ्टीत 100 अंकांची घसरण झाली. शेअरा बाजार बंद होताना मात्र त्यामध्ये आणखी वाढ होऊन सेन्सेक्समध्ये 427 अंकांची घसरण झाली. 

या कंपन्यांचे शेअर्स वधारले

  • Dr Reddys Labs- 2.95 टक्के
  • BPCL- 2.76 टक्के
  • Reliance- 2.74 टक्के
  • Eicher Motors- 2.52 टक्के
  • SBI Life Insura- 2.43 टक्के

या कंपन्यांचे शेअर्स घसरले

  • Tata Steel- 3.86 टक्के
  • Shree Cements- 1.97टक्के
  • Tata Motors- 1.64 टक्के
  • Grasim- 1.48 टक्के
  • NTPC- 1.21 टक्के

महत्त्वाच्या बातम्या: