LPG and CNG Prices : दर महिन्याच्या सुरुवातीला इंधन कंपन्या उत्पादनांचे नवीन दर जाहीर करतात. कंपन्या कधी किमती वाढवतात तर कधी कमी करतात. पहिल्या ऑगस्ट रोजी तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर (19 किलो) 36 रुपयांनी कमी केले होते. याचा थेट फायदा घरगुती एलपीजी ग्राहकांना झाला नाही. आता 1 ऑक्टोबरपासून सीएनजी आणि एलपीजीच्या दरात बदल होऊ शकतो.
वास्तविक, गेल्या महिन्यात घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मात्र व्यावसायिक सिलिंडरची किंमत कमी करण्यात आली. अशा परिस्थितीत यंदा सणाच्या पार्श्वभूमीवर सरकार 14 किलोच्या सिलिंडरच्या दरात कपात करू शकते, अशी अपेक्षा आहे.
एलपीजी सिलिंडरच्या दरात 50 रुपयांनी वाढ करण्यात आली
1 सप्टेंबर रोजी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी स्वस्त झाली होती. त्यानंतर 1 सप्टेंबर रोजी इंडियन ऑइलकडून एलपीजीचे नवीन दर जारी करण्यात आले, त्यानुसार इंडेन सिलेंडर दिल्लीत 91.50 रुपयांनी, कोलकात्यात 100 रुपयांनी, मुंबईमध्ये 92.50 रुपयांनी आणि चेन्नईमध्ये 96 रुपयांनी स्वस्त झाला होता. हा बदल दिल्ली ते पाटणा, जयपूर ते दिसपूर, लडाख ते कन्याकुमारी असा करण्यात आला. पण हा बदल फक्त व्यावसायिक सिलिंडरमध्ये झाला आहे.
तर 14.2 किलोचा घरगुती एलपीजी सिलिंडर फक्त 6 जुलैच्या दराने उपलब्ध आहे. प्रत्यक्षात 6 जुलै रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमती 50 रुपयांनी वाढल्या होत्या.
किंमत कशी ठरवली जाते?
एलपीजीची किंमत ठरवण्यासाठी आयात समता मूल्य सूत्र वापरलं जातं. यामध्ये कच्च्या तेलाची किंमत, सागरी मालवाहतूक, विमा, कस्टम ड्युटी, बंदर खर्च, डॉलर ते रुपया विनिमय, मालवाहतूक, तेल कंपनी मार्जिन, बाटलीची किंमत, विपणन खर्च, डीलर कमिशन आणि जीएसटी यांचा समावेश आहे.
जवळपास समान घटक सीएनजीच्या किमतींवर देखील परिणाम करतात. यातील महत्त्वाचा फरक म्हणजे सीएनजी कच्च्या तेलापासून बनत नाही तर नैसर्गिक वायूपासून बनते. त्यामुळे नैसर्गिक वायूचा परिणाम सीएनजीच्या दरांवर होत आहे. भारत त्याच्या निम्म्याहून अधिक नैसर्गिक वायूची आयात करतो.
इतर महत्वाची बातमी:
येत्या 1 ऑक्टोबरपासून बँकिंग आणि तुमच्याशी संबंधित हे नियम बदलतील, आवश्यक काम पूर्ण करा नाहीतर नुकसान होऊ शकते
350 कॅलरीज बर्न करा आणि एक महिन्याचा पगार मिळवा; Zerodha फर्मचा अनोखा उपक्रम