Zerodha :  350 कॅलरीज बर्न करा आणि एक महिन्याचा पगार मिळवा अशी ऑफरच Zerodha चे नितीन कामथ यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिली असून 10 लाखांचे बक्षीस देऊ केले आहे. ऑनलाइन ब्रोकिंग फर्म Zerodha चे सह-संस्थापक आणि CEO नितीन कामथ यांनी शनिवारी त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांसाठी नवीन आरोग्य उपक्रमाची घोषणा केली. त्यांनी त्यांच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन क्रियाकलापांचे लक्ष्य सेट करण्याचे आव्हान दिले आणि पुढील वर्षभरात त्यांचे आरोग्य उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्यांना बोनस म्हणून एक महिन्याचा पगार देण्याचे आश्वासन दिले.


आपल्यापैकी बहुतेकजण आजही वर्क फॉर्म होम आहेत. महामारीमुळे हा सगळा बदल झाला. आम्ही आमच्या टीममधील प्रत्येकाला खिळवून ठेवण्यासाठी, त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दररोज आरोग्याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आम्ही पुढाकार घेत आहोत असं कामथ यांनी लिंक्डइनच्या पोस्टमध्ये म्हटले आहे.


पुढील वर्षभरात बक्षीस मिळण्यासाठी कर्मचार्‍यांनी त्यांचे दैनंदिन आरोग्य उद्दिष्ट 90 टक्के पूर्ण केले पाहिजे. बोनस म्हणून एका महिन्याचा पगार मिळण्यासोबतच, कंपनी कर्मचाऱ्यांमध्ये प्रेरणा वाढवण्यासाठी 10 लाख रुपयांचा एक लकी ड्रॉ देखील काढणार आहे अशी माहिती कामथ यांनी दिली.


कामथ यांनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे की,  Zerodha मध्ये आमचे नवीनतम आरोग्य आव्हान म्हणजे आमच्या फिटनेस ट्रॅकर्सवर दैनंदिन क्रियाकलापांचे लक्ष्य सेट करण्याचा पर्याय देणे. पुढील वर्षभरात 90 टक्के जे काही उद्दिष्ट ठेवले आहे, त्याला एक महिन्याचा पगार बोनस म्हणून मिळेल. दरम्यान हा एक पर्यायी कार्यक्रम आहे आणि दररोज किमान 350 सक्रिय कॅलरी कोणत्याही स्वरूपात बर्न केल्या पाहिजेत.


Zerodha संस्थापकाने हेल्थ अॅपचा स्क्रीनशॉट शेअर करताना त्यांचा वैयक्तिक अनुभवही शेअर केला. “COVID नंतर माझे सुरुवातीचे वजन वाढल्यामुळे, ट्रॅकिंग क्रियाकलाप हा सर्वोत्तम वाढीचा हॅक आहे, शेवटी आहाराबाबतही अधिक जागरूक राहणे गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. दैनंदिन उद्दिष्ट हळूहळू 1,000 कॅलरीजपर्यंत वाढवले. कामथ यांनी त्यांच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी असा आरोग्य उपक्रम जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ नाही.


तत्पूर्वी जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी, त्यांनी सर्व कर्मचार्‍यांना आव्हान दिलं होतो आणि सांगितले की बॉडी मास इंडेक्स (BMI) 25 पेक्षा कमी असलेल्या कोणालाही बोनस म्हणून अर्ध्या महिन्याचा पगार मिळेल. वजन कमी करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी फायदे जाहीर केले होते. तथापि, प्रत्येकजण या कल्पनेने रोमांचित झाला नाही आणि नेटिझन्सनी या उपक्रमामुळे लोकांना फॅटफोबिया आणि शरीराच्या प्रतिमेच्या समस्यांकडे ढकलले जाईल का अशी चर्चा केली होती.