Kisan Credit card : शेतकऱ्यांना (Farmers) कर्ज घेताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी सरकारनं किसान क्रेडिट कार्ड (Kisan card) योजना सुरू केली आहे. या योजनेत शेतकऱ्यांना तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दोन ते चार टक्के व्याजदराने मिळत आहे. शेतकऱ्यांना सावकारांकडून जास्त व्याजदरानं कर्ज घेऊन शेती करावी लागू नये म्हणून, किसान क्रेडिट कार्ड (KCC) सुरू करण्यात आले आहे. गरज भासल्यास शेतकरी या कार्डवरुन कर्ज घेऊ शकतात.


शेतकऱ्यांनी वेळेवर पैसे भरल्यास या कर्जावरील व्याजदरही कमी राहतो. शेतीसाठी इतके स्वस्त कर्ज इतर कोणत्याही योजनेत उपलब्ध नाही. केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्याची मोहीम राबवत आहे. ज्या अंतर्गत फेब्रुवारी 2020 पासून 4.5 कोटीहून अधिक अर्ज मंजूर करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना शेतीसाठी सुलभ कर्ज मिळण्यासाठी घरोघरी धावण्याची गरज नाही. यासाठी सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना सुरू केली आहे. नावावरून स्पष्ट आहे की, हे एक कार्ड आहे जे शेतकऱ्यांना क्रेडिट म्हणजेच कर्ज सुविधा देते. 


किसान क्रेडीट कार्डवर शेतकऱ्यांना किती कर्ज मिळते?


किसान क्रेडीट कार्ड या योजनेत शेतकऱ्यांना केवळ 4 टक्के वार्षिक व्याजावर 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. या योजनेत शेतीव्यतिरिक्त मत्स्यपालन किंवा पशुसंवर्धनाशी संबंधित लोकांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. या अंतर्गत त्यांना फक्त 2 लाख रुपयांचे कर्ज मिळते. या अंतर्गत 1.6 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज कोणत्याही हमीशिवाय उपलब्ध आहे.


किसान क्रेडिट कार्डचा व्याज दर किती?


केंद्र सरकारने सर्व बँकांना किसान क्रेडिट कार्डवर 4 टक्के दराने कर्ज देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळं त्याच व्याजदराने कर्ज उपलब्ध होते. पैसे वेळेवर जमा केले नाहीत तरच पूर्ण व्याज द्यावे लागते. सवलत कालबाह्य होते. सवलतीशिवाय व्याजदर 9 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो. कार्डधारकांनी वेळेवर पेमेंट न केल्यास चक्रवाढ व्याज आकारले जाते. या कार्डच्या मदतीनं शेतकरी पिकांच्या काढणीनंतरच्या व्यवस्थापनापासून ते दुग्ध व्यवसाय आणि पंप संच खरेदी इत्यादी सर्व काही करू शकतात. विशेष बाब म्हणजे हे कार्ड शेतकऱ्यांना कमी वेळेत आणि फार कमी कागदपत्रांसह 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देते.


किसान क्रेडिट कार्ड काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे?


योजनेचा भरलेला अर्ज
ओळखपत्र- यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असे काहीही देऊ शकता.
पत्ता पुरावा, यामध्ये तुम्ही पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स देखील देऊ शकता.
जमिनीची कागदपत्रे
पासपोर्ट आकाराचा फोटो


महत्त्वाच्या बातम्या:


PM किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावं? सविस्तर माहिती एका क्लिकवर