Kaun Banega Crorepati Prize Money Tax : छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कार्यक्रम 'कौन बनेगा करोडपती' (Kaun Banega Crorepati) या शोचा मोठा चाहतावर्ग आहे. हा शो सुरू होताच घरोघरी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण टीव्हीसमोर बसतात. आपल्यालाही या शोचा भाग बनण्याची किमान एक संधी मिळावी, अशी अनेकांची इच्छा असते. या शोच्या माध्यमातून अनेक जण लखपती आणि कोट्यधीश झाले आहेत. यामधील काही जण यशस्वी होतात आणि एक कोटी रुपये (Kaun Banega Crorepati) जिंकतात, पण त्यांना एक कोटी रुपये ही संपूर्ण रक्कम मिळत नाही. 


'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये जिंकणाऱ्याला किती रुपये मिळतात?


बॉलिवूडचे (Bollywood) महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा मेगा शो कौन बनेगा करोडपती सीझन 15 ला सध्या भरघोस प्रतिसाद मिळत आहे. अनेकांना केबीसी पाहणं खूप आवडतं. पण तुम्हाला हे माहित नसेल की, एक कोटी रुपये जिंकल्यानंतर किती रुपये (KBC Prize Money Tax) मिळतात, याबद्दल तुम्हाला माहित आहे का? नसेल तर येथे जाणून घ्या.


विजयी रकमेवर किती व्याज कापला जातो?


'कौन बनेगा करोडपती' शोसाठी बक्षीस (KBC Prize Money) म्हणून मिळालेल्या रकमेवर कर भरणे बंधनकारक आहे. एखाद्या स्पर्धकाने आपल्या मेहनतीने पैसे जिंकले असतील तर, त्यावर टॅक्स का कापला जातो, असा प्रश्न तुमच्या मना उपस्थि होऊ शकतो. यामागचं कारण म्हणजे आयकर विभाग स्लॅबऐवजी या विजयी रकमेवर थेट 30 टक्के कर आकारतो.






'एवढी रक्कम हातात येते


30 टक्के कर आकारण्यासोबतच जिंकलेल्या रकमेवर 4 टक्के उपकर देखील आकारला जातो. यामुळे या शोमध्ये 1 कोटी रुपये जिंकणाऱ्या व्यक्तीला फक्त 70 लाख रुपयेच मिळतात. अहवालानुसार, "कौन बनेगा करोडपती" च्या 15 व्या सीझनच्या विजेत्याला 1 कोटी रुपये जिंकल्यावर 30 टक्के आयकर कापून उर्वरित रक्कम दिली जाते, ज्यामुळे त्याला प्रत्यक्षात फक्त 70 लाख रुपये मिळतात.


रकमेतून कर आणि उपकर वजा


'कौन बनेगा करोडपती' शोमध्ये जिंकलेल्या एक कोटी रुपयांच्या रकमेवर 4 टक्के उपकर देखील भरावा लागतो, ज्याची रक्कम 1.32 लाख रुपये असेल. हा कर शिक्षण आणि कृषी क्षेत्रासाठी गोळा केला जातो.