Bank Holidays in July 2022 : जून महिना संपून लवकरच जुलै महिना सुरु होणार आहे. अशा वेळी, तुमची बॅंकेत काही महत्वाची कामे असतील तर आताच उरकून घ्या. कारण जुलै महिन्यात बारा दिवस बॅंका बंद राहणार आहेत. या सुट्ट्या संपूर्ण देशभरात लागू होणार आहेत. नुकत्याच, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार जून महिन्यात कोणत्या दिवशी बॅंका बंद असणार आहेत याची यादी जाहीर केली आहे.  


रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या कॅलेंडरनुसार जुलैमध्ये एकूण बारा दिवस बँक सुट्टी असेल. राज्य आणि तिथल्या सणानुसार या सुट्ट्या बदलू शकतात. बँक सुट्ट्यांची यादी आरबीआय (RBI) 4 आधारावर जारी करते. ही यादी देशभरात आणि राज्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या सणांवर आधारित आहे.


जुलै 2022 मधील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी :


1 जुलै 2022 : कांग (रथजत्रा) / रथयात्रा (भुवनेश्वर, इंफाळ)


3 जुलै 2022 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)


9 जुलै 2022 : दुसरा शनिवार


10 जुलै 2022 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)


11 जुलै 2022 : ईद-उल-आझा (जम्मू, श्रीनगर)


13 जुलै 2022 : भानू जयंती (गंगटोक)


16 जुलै 2022 : हरेला (डेहराडून)


17 जुलै 2022 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)


23 जुलै 2022 : चौथा शनिवार


24 जुलै 2022 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)


26 जुलै 2022 : केरला पूजा (अगर)


31 जुलै 2022 : रविवार (सार्वजनिक सुट्टी)


वरील नमूद केलेल्या दिवसांच्या सुट्ट्या रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार लागू होणार आहेत. या बॅंकेच्या सुट्ट्या असल्या तरी खातेधारकांनी बॅंकेचे काही काम करण्यासाठी नेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरू शकतात. तुम्ही या सुट्ट्यांचा मागोवा ठेवल्यास, तुम्ही बँकेच्या व्यवहाराची अधिक चांगल्या पद्धतीने योजना करू शकाल. लाँग वीकेंडसाठी, तुम्ही तुमच्या सुट्ट्यांचे उत्तम नियोजन देखील करू शकता.


महत्वाच्या बातम्या :