Twitter Deal : ट्विटरच्या संचालक मंडळानं (Twitter Board of Directors) टेस्ला कंपनीचे सर्वोसर्वा आणि जगातील श्रीमंत व्यक्तीपैंकी एक असलेल्या एलन मस्क यांना मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर 44 अब्ज डॉलर्समध्ये विकण्याची परवानगी दिली आहे. ट्विटरनं मंगळवारी यूएस सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनकडे या संदर्भात रेगुलेटरी फाइलिंग केली. ट्विटर बोर्डानं एकमतानं 44 बिलियन डॉलर्समध्ये मस्क यांना खरेदीला मंजुरी दिली आहे.
संचालक मंडळाकडून करार मान्य
Twitter Board of Directors ला असं आढळून आलं की, विलीनीकरणाचा करार मान्य करण्यासारखा आहे आणि विशेष म्हणजे, हा व्यवहार ट्विटर आणि त्याच्या भागधारकांच्या हिताचा आहे. या बातमीनंतर ट्विटरच्या शेअर्सची किंमत जवळपास तीन टक्क्यांनी वाढून 38.60 डॉलर प्रति शेअरवर पोहोचली.
ट्विटर डील संशयाच्या भोवऱ्यात
मस्क यांनी मंगळवारी सांगितलं की, ट्विटरसोबत अजूनही काही समस्या आहेत. मस्क यांनी कतार इकॉनॉमिक फोरमला सांगितलं की, ट्विटरवर बॉट्सची खरी संख्या किती आहे? हे जाणून घेण्यासाठी ते अजूनही वाट पाहत आहेत. आपल्याला ट्विटरचे सीईओ व्हायचं नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ट्विटरवर मोठ्या संख्येनं बॉट्सच्या उपस्थितीमुळे नाराज झालेल्या मस्कनं मे महिन्यात ट्विटर विकत घेण्याचा करार केला होता.
काही दिवसांपूर्वी मस्क यांनी स्पष्ट केलं होतं की, ट्विटरवरील स्पॅम खाती 5 टक्क्यांपेक्षा कमी असतील तरंच ट्विटर अधिग्रहण करार पुढे जाईल. इलॉन मस्क म्हणाले होते की, ट्विटरवरील सुमारे 22.9 कोटी खात्यांपैकी किमान 20 टक्के खाती 'स्पॅम बॉट्स'द्वारे चालवली जात आहेत. जे ट्विटरच्या दाव्यापेक्षा 4 पट जास्त आहे.
ट्विटरनं 44 अब्ज डॉलरचा करार
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती अब्जाधीश एलन मस्क यांनी सुमारे 44 अब्ज डॉलर्समध्ये ट्विटर विकत घेण्याची घोषणा केली होती.
दरम्यान, ट्विटर या सोशल नेटवर्किंग (मायक्रोब्लॉगिंग) साईटचे सर्वाधिक म्हणजे तब्बल 9 टक्के शेअर खरेदी केल्यानंतर एलन मस्कला ट्वीटरने संचालक मंडळात स्थान दिलं होतं. ट्वीटरचे सीईओ पराग अग्रवाल यांनीच स्वतः ट्वीट करुन यासंदर्भात माहिती दिली होती.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Elon Musk on Twitter: इलॉन मस्क यांनी ट्विटर डील रद्द करण्याचा दिला इशारा, डेटा लपवल्याचा आरोप